नाशिक ग्रामीण

बागलाण तालुक्याला पैसा कमी पडणार नाही


वेगवान नाशिक / शशीकांत बिरारी 

कंधाणे, ता. 17 आॅगस्ट 2024- 

 

कंधाणे:- बागलाण विधानसभा मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा हा मानसं मनाशी बाळगून कोणताही भेदभाव न बाळगता विकास कामे सुरू आहेत.ग्रामीण भागातील नागरी सुविधांना निधी कमी पडू देणार नाही

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

.त्यासाठी शासनस्तरावर भगीरथ प्रयत्न केले जातील अशी ग्वाही बागलाचे आमदार दिलीप बोरसे यांनी कंधाणे येथील विकास कामांना निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी भेटीस आलेल्या नागरिकांच्या शिष्टमंडळास दिले.कंधाणे येथील नागरिकांचे ग्रामदैवत असलेल्या जगदंबा माता मंदिराची दगडी संरक्षण भिंत जीर्ण झाली असून ,जीर्ण झालेली ही भिंत कोसळून एखाद्या वेळी मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

नागरिकांनी लोकसहभागातून दहा वर्षांपूर्वी मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी येथे एक दगडी संरक्षण भिंतीचे बांधकाम केले आहे.या जगदंबा माता मंदिराची नंतर शासनाने तीर्थ क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत समावेश केल्याने शासनाच्या माध्यमातून विविध योजनांमधून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत.पण लोकसहभागातून बांधण्यात आलेली ही संरक्षण भिंत मात्र आजमितीला जैसे थे आहे.

 

 

या मंदिर परिसरात अंगणवाडी केंद्र सुरू असून अनेक लहान वयोगटातील मुले या शाळेत येत असतात.या जीर्ण भिंतीमुळे पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडू शकते यासाठी येथील सोसायटीचे माजी सभापती प्रमोद बिरारी, माजी पोलीस पाटील बाळासाहेब बिरारी, सुरेश बिरारी, दिलीप बिरारी, शशिकांत बिरारी, यांनी या संरक्षण भिंतीच्या कामासाठी स्थानिक विकास निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार दिलीप बोरसे यांच्या कडे केली.याची तात्काळ दखल घेत संबंधितांना या कामासाठी सुचना देण्यात आल्या आहेत.आमदारांनी दाखवलेल्या तत्परतेने कंधाणे वासी यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित हास्य उमटले होते.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!