शेती

बायको लयी खुश झाली राव …आता बायको सांगेल त्याला मतदान व्हिडीओ तुफान व्हायरलं

बायको लयी खुश झाली...आता बायको सांगेल त्याला मतदान व्हिडीओ तुफान व्हायरलं


वेगवान नाशिक  / साहेबराव ठाकरे 

नाशिक, ता. 17 आॅगस्ट 2024 – लाडकी बहिण योजने आता संपूर्ण महाराष्ट्रात कहर केला आहे. कारण ज्या ठिकाणी जावे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची चर्चा आहे. आता बायको सांगेल तिकडे मतदान करावा लागेल ,कारण एकनाथ  पाहुण्याने बायकोच्या खात्यात 3000 हजार पाठविले त्यामुळे आता महायुतीला मतदान करावा लागेल असे एक व्हिडीओ सध्या चर्चाेत आला आहे.

 

वेगवान मराठी या न्यूज चॅनलवरील हा व्हिडीओ सध्या तुफान चर्चा करीत आहे. यामध्ये एका शेतक-याने सध्या परिस्थितीवर भाष केल्ं आहे. कारण या शेतक-याने सांगितेल  की सध्या लाडकी बहीणे कहर केला आहे. मी जरी काही कमवत नसलो तरी बायकोला पगार सुरु झाल्यामुळे आता  बायकोची लयी मज्जा झाली.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

मी मात्र नांगराच्या पाळ्या टाकूनचं मरणार असे हा शेतकरी या व्हिडीओ मध्ये बोलतांना म्हटले आहे. तुम्हाला काही माहिती झालं का, मया बायकोला पगार चालु झाला… तिला तिच्या भावाने महिन्याला पगार चालु केला.

 

मतदान कोणाला करणार हे म्हटल्यानंतर बायको सांगेल त्याला मतदान करावे लागेल भो.. कारण आता आमचा संबंध लयी मोठा झाला आहे. थेट मुख्यमंत्री मेव्हाणा झाला म्हटल्यावर माझी  पोज वाढली आहे.  यानंतर सदर शेतकरी म्हटला मला पण जरा धोकाचं वाटतो…यावेळी  पत्रकार एकनाथ भालेराव यांनी विचारलं कसं काय…त्यावर शेतकरी म्हटला…मागील वर्षी मुंगाला 14000 भाव होता..यंदा पार वाट लागली.

 

मला असं वाटतं माझ्या बायकोचे पैसे माझ्याकडून काढून तिच्याकडे वळविले की काय असही हा शेतकरी म्हटला.  एक प्रकार शेतक-याची व्यथा मांडणार आणि  खळखळून हसविणार व्हिडीओ वेगवान मराठीवर प्रसिध्द झाला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मिडीयावर सुध्दा व्हायरलं होऊ लागल आहे.

 

काही असो कोणाचे काही होऊ बायकोची फार मज्जा झाली. बायको लयी खुशी झाली राव…मी मात्र नांगर हाकू हाकून जाणार असं संवाद ऐकून लोक या व्हिडीओवर लाईकचा पाऊस पाडत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!