पावसाने फलंदाजी केली सुरु, एवढा पाऊस …आता महाराष्ट्रात पाणीचं पाणी
पावसाने फलंदाजी केली सुरु, एवढा पाऊस ...आता महाराष्ट्रात पाणीचं पाणी
वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
Maharashtra Rainfall Update: मुंबई, ता. महाराष्ट्रात पावसाने दडी मारली अनं..कड उनं पडलं. महाराष्ट्रात पावसाने काही ठिकाणी चांगली हजेली लावली मात्र महाराष्ट्रातील नाशिक मध्ये सर्वात कमी पाऊस नोंदविला गेला. मात्र सलग कडक पडणा-या उन्हामुळे पिकांची पाने पिवळी पडण्यास सुरु झाली आहे. मात्र हवामान खात्याकडून एक मोठं अपडेट आले असून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा रौद्र रुप धारण केलं असून आजपासून महाराष्ठ्रात पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे. The rain started batting, now and then the rain comes…Maharashtra water comes, water comes
ली तरी काही भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. काही प्रदेशांमध्ये मुसळधार पावसाचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. उदाहरणार्थ, अहमदनगरमधील जामखेड परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. यामुळे साकत भागातील अनेक वाड्या-वस्त्यांचा उर्वरित भागाशी संपर्क तुटला आहे. तसेच बीडच्या पाटोदा शहरी भागात सुमारे तीन ते चार तास जोरदार पाऊस झाला. अकोट तालुक्यातील मोहळा येथे मुसळधार पाऊस आणि पुरामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जेसीबी मशीनच्या साह्याने बचाव कार्य
अहमदनगरमधील जामखेड परिसरात आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे साकत भागातील अनेक वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. शेतजमिनींचे तलावात रूपांतर झाले असून अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. साकत कोल्हेवाडी ते कडभानवाडीला जोडणारा लेंडी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेकांचा संपर्क तुटला आहे. आज सकाळी जेसीबी मशिनच्या मदतीने काही जणांची सुटका करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनाही पाण्यामुळे घरी परतावे लागले, त्यांचे शिक्षण विस्कळीत झाले. या पुलाची उंची लवकरात लवकर वाढवावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.
बीडच्या पाटोदा शहरी भागात काल (शुक्रवारी) रात्री तीन ते चार तास मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे पाटोदा शहरातून वाहणाऱ्या मांजरा नदीला पूर आला. त्यामुळे पाटोदा येथील शाळा, महाविद्यालयांना आज प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. पाटोदा येथे मुसळधार पावसाने नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. मांजरा नदीचा उगम पाटोदा तालुक्यात होत असून, नदीच्या उगम भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे सध्या ती दुथडी भरून वाहत आहे.
कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे?
गेल्या २४ तासांत मुंबईच्या काही भागात हलक्या पावसाची नोंद झाली. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, तसेच कल्याण, डोंबिवलीत रिमझिम पाऊस झाला. पुढील २४ तासांत आकाश अंशतः ढगाळ राहील, शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 26°C च्या आसपास राहील.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विखुरलेले वादळे, जोरदार वारे (30-40 किमी/तास), आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. सांगली, सोलापूर, चंद्रपूर, लातूर, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या जिल्ह्यांसाठी पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.