नाशिक क्राईम

देवळाः काय सांगता, चोरट्यांनी तब्बल तेरा दुकाने फोडली; हजारोंचा मुद्देमाल लंपास (व्हिडीओ)

देवळाः काय सांगता, चोरट्यांनी तब्बल तेरा दुकाने फोडली; हजारोंचा मुद्देमाल लंपास व्हिडीओ


वेगवान नाशिक / मनोज वैद्य

दहिवड,देवळा –

 

देवळा तालुक्यातील वाजगाव येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल तेरा दुकानांचे कुलूप तोडत हजारो रूपयांची रोकड लंपास केली. रात्रीतून १३ दुकानांत चोरट्यांनी चोरी करत पोलीस यंत्रणेपुढे आव्हान उभे केले आहे. या घटनेने गावात दहशतीचे वातावरण पसरले असून या चोरट्यांचा त्वरीत शोध घेण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांतर्फे तब्बल एक-दोन नव्हे तर गावातील तेरा दुकानांचे कुलूप व शटर तोडत धाडसी चोरी केली गेली. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानातील साहित्याकडे दुर्लक्ष करत गल्ला फोडून रोख रक्कम लंपास केली. आज दि.१७ रोजी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.

 

 

चोरट्यांनी गावातील संदीप देवरे यांचे अक्षर किराणा स्टोअर्स, जगन्नाथ आहेरांचे गणेश वेल्डिंग वर्कशॉप, वैभव पवार यांचे वक्रतुंड मेडिकल, शुभम पवार यांचे ग्रो सर्विसेस, भाऊसाहेब काकुळते, संदीप देवर, शैलेंद्र देवरे, किरण नलंगे, बाळू महाले, पुंडलीक देवरे यांचे किराणा दुकान तसेच प्रशांत पगारे, दिलीप पगारे यांचे सलून सेंटर तर विनोद महाले यांचे टेलरिंग सेंटर, विकास देवरेंचे आपले सरकार सेवा केंद्र, गणेश बच्छाव यांचे झेरॉक्स दुकान, पांडुरंग देवरे यांचे मोटर रिवायडींग दुकानांचे शटरचे कुलूप तोडून गल्ल्यात असलेली हजारो रूपयांची रोकड लंपास केली.

 

पुंडलिक शंकर देवरे यांचे किराणा दुकानातून आठ हजार तर अन्य दुकानदारांच्या गल्ल्यातील किमान तीन ते चार हजाराची रोकड चोरट्यांनी लांबवली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

हा प्रकार उघडकीस येताच पोलीस पाटील निशा देवरे यांनी माहिती देताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!