अंकाई – टंकाई किल्यावरील एक बिबट्या पिंजर्यात दुसर्यासाठी पिंजरा पुन्हा लावला
वेगवान नाशिक / मारूती जगधने
नांदगाव, 17 आॅगस्ट 2024-
नांदगांव मारूती जगधने नांदगांव येवला सीमेवरील अगस्तीमुनी ऋषी चे वास्तव्ये असलेल्या अंकाई- टंकाई किल्यावर व परिसरात दोन बिबट्यांचे वास्तव्ये आनेक दिवसा पासून होते या संदर्भात नागरीकानी तक्रार केल्यावर या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता या पिंजर्यात दि १७ रोजी बिबट्या आडकला असून आजुन दुसर्या बिबट्याच्या शोधात वनविभाने पुन्हा पिंजरा या परिसरात लावला आहे परिसरात बिबट्याची दहशत असल्याने व खरीप पिके जोमाने वाढली असून या मुळे शेतावर जाने कठीन झाले आहे एक बिबट्या पिंजर्यात आला असला तरी आजुन दुसारा बिबट्या ची दहशत कायम आहे.
बागलाण तालुक्याला पैसा कमी पडणार नाही
अंकाई किल्ल्याच्या पायथ्याला घनदाट झाडीत बिबट्याचे दर्शन झाले होते.अंकाई किल्ल्यावर श्रावणात पर्यटकांची वर्दळ असते नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या अंकाई किल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या पर्यटकाना बिबट्या नजरेत आला होता ते वृत्त बागलाण वृत्तांताने प्रसिध्द करताचा येवला वनविभागाने दखल घेत त्याठिकाणी पिंजरा लवाला बिबट्या संदर्भात प्रबोधन केले.
भुसावळपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांसाठी धावणार विशेष गाडी
दरम्यान अंकाई -टंकाई किल्ल्याजवळ दि ४ आॅगस्ट रोजी ट्रेकिंग करत असताना मनमाड न पा.चे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, प्रवीण व्यवहारे , किरण भाबड ,गणेश वाहळे, डॉक्टर भागवत दराडे ,यांना बिबट्याच्या हालचाली निरदर्शनस आल्या प्रत्यक्षात बिबट्या निदर्शनात आला त्यावेळेस वन्यप्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी यांनी संगीतले की अंकाई ,विसापूर, कातरणी, कातरवाडी, वडगांव पंगू ,रापली परिसरातील नागरिकांनी परीसरात शेती काम करत असताना सावधानी बाळगावी तसेच श्रावण महिना चालू झाला असून या काळात नागरीक,भाविक देवदर्शनाला व पर्यटनाला अंकाई- टनकाई किल्ल्यावर येतात.
पावसाने फलंदाजी केली सुरु, एवढा पाऊस …आता महाराष्ट्रात पाणीचं पाणी
त्यामुळे सगळ्यांनी ट्रेकिंग , देव दर्शन ,डोंगर भ्रमंती करताना किंवा डोंगरावरती चढताना व परिसरात रात्री अप रात्री काम करत असताना सावधानी बाळगावी असे वन्य पशु प्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी पत्रकारांना माहिती दिली
महाराष्ट सरकार शेतक-यांना मोफत वाटू लागले फवारणी पंप, तुम्हाला मिळाला का
दिनांक 4/8/ 2024 रोजी सकाळी सात वाजता अनकई डोंगरावरती ट्रेकिंग करत असताना परिसरात दोन-तीन बिबटे असल्याची माहिती वन्य पशु प्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी देखील देखील सांगीतले होते या सर्व बाबींची दखल घेत पिंजरा लावल्याने एक बिबट्या त्यात आडकला असून आता दुसर्या बिबट्याच्या शोधात वनविभाग लक्ष ठेऊन आहे .
महाराष्ट सरकार शेतक-यांना मोफत वाटू लागले फवारणी पंप, तुम्हाला मिळाला का
दरम्यान अंकाई किल्ला, गोरक्षनाथ, कातरवाडी ,कातरणी ,विसापूर, वडगाव पंगु येथील कातरा किल्ला हडबिची शेंडी ,वंजारवाडी व मनमाड परिसरात वारंवार बिबट्या आढळून येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते अखेर वन विभागाने नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी जाधव वस्ती येथे बिबट्याला सकाळी सात वाजता पिंजऱ्यामध्ये जोरबंद केले अशी सविस्तर माहिती वन्य पशु प्राणी मित्र समाजसेवक भागवत झाल्टे यांनी समाज माध्यमांना दिली माहिती.