रक्षाबंधनानिमित्त भुसावळपर्यंत धावणार विशेष गाडी
रक्षाबंधनानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय
वेगवान नाशिक/Wegwan Nashik :- विशेष प्रतिनिधी, 17 ऑगस्ट –
रेल्वे प्रशासनाद्वारे रक्षाबंधन निमित्त अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी भुसावळ ते इगतपुरी दरम्यान अनारक्षित विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. विवरण पुढील प्रमाणे
०१००२ विशेष दिनांक १८.०८.२०२४ आणि १९.०८.२०२४ रोजी भुसावळ येथुन १३.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १९.३५ वाजता इगतपुरी येथे पोहोचेल. (२ फेरी)
०१००१ विशेष दिनांक १८.०८.२०२४ आणि १९.०८.२०२४ रोजी इगतपुरी येथून २०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता भुसावळ येथे पोहोचेल. (२ फेरी)
थांबे:- जळगाव, म्हसावद, पाचोरा, कजगाव, चाळीसगाव, नायडोंगरी, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड आणि देवळाली.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.