वेगवान नाशिक
नाशिक ,ता. 16 – बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूंवरील हिंसाचाराच्या विरोधात भारतभर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
राज्यात आज बंदची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात देखील सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांकडून नाशिक शहरात बाईक रॅली काढण्यात आली.
महाराष्ट सरकार शेतक-यांना मोफत वाटू लागले फवारणी पंप, तुम्हाला मिळाला का
नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठातील परिसर आणि मुस्लिम बहुल भागात देखील बाईक रॅली काढून बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले. हिंदू समाजाच्या बाईक रॅली दरम्यान नाशिक शहर पोलिसांचा देखील कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बच्चू कडू आता विधानसभेच्या मैदानात बॅटने फलंदाजी करणार
याचदरम्यान दोन गटामध्ये मोठा राडा झाला आणि दगडे फेक व दंगलीचे स्वरुप प्राप्त झाले. सर्वांची पळापळ व धावपळ उडाली. यामध्ये काही जण जखमी झाले. रस्त्यावर दगडे पडलेली, दोन्ही गटाकडून दगडफेक सुरु होती. पोलीस परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सतत प्रयत्न करीत होती.
आता नाशिक सह या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार, हवामान खात्याकडून अर्लट जारी
नाशिक मधील दंगल घडल्याचे व्हिडीओ व्हायरलं झाले असून पोलीसांनी यावेळी आश्रु धाराचा मार केला. परिस्थ्ति नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. नाशिक मध्ये दोन्ही बाजून दगड फेक केली जात होती. हिंदुच्या बाजूने घोषणा देण्यात आल्या. आता नाशिक मधील परिस्थिती नियंत्रणातून असून कोणीही अफवा पसरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.