1 नंबर…नाशिक व नगर जिल्ह्यातील खासदार-आमदाराने केलं एवढं मोठं दान
वेगवान नाशिक / भाऊसाहेब र, हांडोरे
सिन्नर : दि .१५ ऑगस्ट 2024 – समजामध्ये अजून ही असे लोक जे लोक पैशाला किंमत देत नाही. मात्र किंमत दिली जाते ती म्हणजे या समाजाचे मी काहीतरी देणं लागतो याला…याचं कारण असे जर आपण एखांद्या लोकप्रतिनिधीकडे काही कामासाठी वर्गणी मागण्यासाठी गेलो तर ते आज देऊ उद्या देऊ करणारे अनेक लोकप्रतिनिधी आपल्याला दिसतील मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये एका खासदारांने तब्बल 15 लाख रुपयांचे दान केल्यामुळे हा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
कारण कधी कधी 1 रुपया आपल्याला गाडीच्या चाकाऐवढा वाटतो. मात्र दान करणा-या व्यक्तीचं मन मोठं असेल तर त्यापुढे सर्व फिकं पडतं. याचे हे ज्वल्ंत उदाहरण.
सध्या सिन्नर तालुक्यात सराला बेट गोदावरी धाम येथील सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थांनच्या वतीने यंदाच्या 177 व्या फिरत्या नारळी सप्ताहाचे आयोजन सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे शनिवार दि. 10 ऑगस्ट पासून करण्यात आले आहे. विश्वविक्रम स्थापित केलेल्या या सप्ताह सोहळ्यात हरिनामाचा अखंड जागर चालणार असून सप्ताहाच्या संपूर्ण कालावधीत सुमारे 50 लाख भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे.
वारकर्यांचा महाकुंभ , गंगांगीरी सप्ताहाच्या निमित्ताने सिन्नर तालुक्यातील माजी आमदार व नाशिक चे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी आज येथे आवर्जून उपस्थित राहुन या सप्ताहा साठी तब्बल रुपये १५ लाख अशी भरभरून देणगी देऊन आपल्या समाजसेवा या उदात्त हेतूने प्रेरित झालेल्या राजाभाऊ यांनी ह्या महान धार्मिक कार्यासाठी केलेलं त्यांचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे. कारण हे पैसे त्यांनी खाजदार निधीतून न देता ते त्यांचे व्यक्तीगत दान म्हणून देण्यात आले आहे. यामध्ये कोपरगावचे आमदार अशितोष काळे यांनी 11 लाख रुपयांची देणगी दान म्हणून दिली आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांची १५ लाखांची देणगी. सप्ताहासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी यापूर्वी ध्वजारोहण कार्यक्रमात २० हजार भाविकांना महाप्रसादाची पंगत दिली होती. पुन्हा १५ लाख १ हजार १११ रुपयांची देणगी दिली आहे. कोपरगावचे आमदार अशितोष काळे यांनी ११ लाख रुपये. दिनकर पाटील यांनी १ लाख रुपये देणगी दिली आहे. शुक्रवार दि.१६ ऑगस्ट रोजी एकादशीला साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद मिळणार आहे.