या तारखेपासून नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार
या तारखेपासून नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला 14ऑगस्ट 2024/महाराष्ट्रात बहुतेक भागात पाऊस थांबला आहे. पाऊस थांबल्याने तापमानात वाढ झाली आहे. रिमझिम पावसाने विश्रांती घेतली असून आता तो डायरेक्ट १० ते १२ दिवसांनी बरसणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे.
गेल्या तीनचार दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून, आता पावसाचा अंदाज आहे. १५ ऑगस्टपासून वाढण्याचा अंदाज आहे.
राज्यात मात्र पुन्हा पावसाला प्रारंभ होईल, असा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये तुलनेत कमी पाऊस भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑगस्टमध्ये ९४ ते १०० टक्के पाऊस बरसणार आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात खूप चांगला पाऊस झाला. सरासरी ५३ टक्के पाऊस पहिल्या आठवड्यात झाला. त्यानंतर ९ ते १० ऑगस्टपासून राज्यातील मोठा पाऊस कमी होण्यास सुरुवात झाली. १३ ऑगस्ट रोजी दिलेल्या अंदाजानुसार राज्यातून मोठा पाऊस पूर्ण ओसरला आहे.
राज्यात १८ ऑगस्टपर्यंत सर्वत्र रिमझिम पावसाचा अंदाज असून, १९ पासून पाऊस वाढण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे.
केरळ ते गुजरात या भागात कमी दाबाचा पट्टा जुलै महिनाभर सक्रिय होता. त्यामुळे अतिवृष्टी ते मुसळधार, असा पाऊस झाला. हा पट्टा ८ ऑगस्टपर्यंत सक्रिय असल्याने पहिल्या आठवड्यातही चांगला पाऊस झाला. मात्र, सध्या राज्यात कमी दाबाचे पट्टे विरले आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला असून, कमाल तापमानात एकदम ८ ते १० अंशांनी वाढ झाल्याने वातावरणातला गारवा कमी होऊन उकाडा वाढण्यास सुरुवात झाली आहे.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये