नाशिक ग्रामीण

आता नाशिक सह या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार, हवामान खात्याकडून अर्लट जारी


वेगवान नाशिक

Pune News : नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग कोरडा ठाक असून नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सरकारी दरबारामध्ये नाशिकमध्ये सर्वात कमी पाऊस नोंदविला गेला आहे. मागील वर्षी दुष्काळ आणि यंदा अजून पाऊस होत नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

नाशिक जिल्ह्यासाठी हवामान कसे आहे याचा एक आढाव आपण घेणार आहे. मात्र हे हवामान चे अपडेट आपल्याला  समजून घ्यायचे आहे. कारण दिंडोरीच्या पश्चिन पट्यात पाऊस झाला मात्र निफाड, चांदवड , देवळा, कळवण , मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर या भागामध्ये पावसाची गरज आहे.

 

पावसानं उघडीप दिल्यानं राज्यात उन्हाचा चटका वाढू लागलाय. त्यामुळं उकाड्यातही वाढ जाणवू लागली आहे. तर काही ठिकाणी पावसाची भुरभुर हजेरी लावतेय.

 

आज कोकण, मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्रात हलक्या सरी हजेरी लावतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तर बहुतांश भागात प्रामुख्याने उघडीप राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच शनिवारपासून मात्र राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

 

राज्यात आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर पुढील आठवड्यात पाऊसाचै जोर वाढणार असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  ही बातमी संपूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला याची माहिती मिळण्यास मदत होईल .

 

शनिवारी मात्र मराठवाड्यातील नांदेड, लातूर. धाराशिव, तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर रविवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

 

राज्यात पावसाने उघडीप दिल्यानं काही भागात शेती कामांना वेग आला आहे. तर काही भागात उन्हाचा चटका वाढल्यानं सकाळी टवटवीत दिसणारी पिकं दुपारी मात्र मान टाकू लागली आहेत. हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

 

कोठे होणार अतिवृष्टी पहा नकाशा

 

बुक्कीत टेंगुळ म्हणजे रिलस्टार सुरज चव्हाणला मुलीने प्रेमात धोका दिला.. व्हिडीओ पहा

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!