आज कांद्याच्या भावात घसरणं, पहा आजचे भाव ( व्हिडीओच पहा)

वेगवान नाशिक
नाशिक, ता. 14 – नाशिक जिल्ह्याचे नगदी पिक कांदा म्हटलं तर वावगे ठरणार नाही. आज नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतक-यांचा आधार कांदा पिक आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील ज्या भागामध्ये उन्ह्याळ्यात कांद्याचे पीक घेतले जाते. Buy a car cheaply
त्या भागात सिंचनाची व्यवस्था असते. त्यामुळे निफाड, येवला तालुक्यातील काही गावे, तसेच सटाणा, देवळा मालेगाव तालुक्यातील अनेक गावामध्ये उन्हाळ्यात पाणी असते त्यामुळे त्या ठिकाणाहुन उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात निघतो.
आज कांद्याच्या भावाची स्थिती सांगायची झाल्यास कांद्याच्या भावमध्ये आज घसरून दिसून आली. नाशिक जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी कांदा 36 रुपयांवर गेला होता. आज मात्र 300 रुपयांची घसरण दिसून आली.
नाशिक जिल्ह्यातील उमराणे बाजार समितीमध्ये 3600 रुपयांवर कांदा गेला होता. मात्र आज त्याच बाजार समितीमध्ये कांद्याला कमी भाव मिळाला. ज्या शेतक-यांचे कांदे चाळीतमध्ये साठवून ठेवले आहे. त्यांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे.
आज नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समितीमध्ये कांद्याला 300 रुपयांची घसरण झाली आहे.
