नार पार मुळे फक्त नाशिकमधील चार तालुक्यांना फायदा, बाकी वंचीत
नार पार मुळे फक्त नाशिकमधील चार तालुक्यांना फायदा, बाकी वंचीत
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला /दिनांक. 13ऑगस्ट /नार-पार प्रकल्पास प्रशासनाने मान्यता दिल्याने आनंदाचे वातावरण असले, तरी ब्रिटिश कालीन दुष्काळी असलेल्या येवला चांदवडचा या योजनेत कुठेही नामोल्लेख नसल्याने या दोन तालुक्याची ची समस्या ‘जैसे थे’ राहणार आहे.
दरम्यान, याबाबत आता येवला चांदवडच्या सर्व नेत्यांनी एकत्र येत लढा उभा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
अन्यथा, येणाऱ्या अनेक पिढ्या विद्यमान लोकप्रतिनिधींना अकार्यक्षम नेतृत्व म्हणून लक्षात ठेवतील, अशी चर्चा दबक्या आवाजात जनता बोलून दाखवत आहेगेल्या अनेक वर्षांपासून अधिक काळ नार-पार प्रश्नावर राजकारण सुरु आहे.
महाराष्ट्रात बरसणाऱ्या पर्जन्यातून उपलब्ध होणार पाणी मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात वाहून जात आहे. हे पाणी गिरणा खोऱ्यात वळवून कित्येक शेतकऱ्यांच सुजलाम् सुफलाम् शेतीचे स्वप्न साजरे होणार आहे.
केंद्राकडून सहकार्याची अपेक्षा असताना केंद्राने हात वर केले केले.
मात्र राज्य सरकारने स्वतःच्या हिंमतीवर हा प्रकल्प तडीस नेण्याचा संकल्प करून मोठी आशा निर्माण केली आहे.
परंतु,येवला चांदवडकर जनता तहानलेलीच राहणार असल्याने आगामी काळात नार-पारचे पाणी पेटनार आहे
नार-पार प्रकल्पाचा लाभ येवला चांदवडलाही मिळायला हवा अन्यया, जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही
येवला चांदवड हा एकमेव तालुका दुष्काळी म्हणून गणला जातो. प्रत्येक तालुक्याला ह्या ना त्या मागनि पाण्याची व्यवस्था असताना येवला चांदवड तालुकाच कायम तहानलेला राहिला आहे.
अल्पभूधारक शेतकरीत्यातही कायम पावसाच्या पाण्यावरअवलंबून येथील शेती व्यवस्था असल्याने बारमाही पाण्यासाठी कायमस्वरूपी नियोजनाची गरज येवला चांदवड तालुक्याला आहे.
शेतीच घटणार उत्पन्न, नैसर्गिक आपत्ती, बेरोजगारांचा मोठा प्रश्न तालुक्यात आ वासून उभा आहे. अशा परिस्थितीत नारपार प्रकल्पाची व्याप्ती वाढवून येवला चांदवडकरांना न्याय देणे अपेक्षित असताना येवला चांदवड तालुका वंचित ठेवला गेल्याने कित्येक पिढ्यांचे भविष्य कोरडेच राहणार आहे.
येत्या काळात इथले लोकप्रतिनिधी येवला चांदवडसाठी पाणीदार भूमिका घेतील की ‘कोरडेच’ राजकारण करतील, याकडे आताज नतेचे लक्ष लागून आहे
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये