जिवात जीव असेपर्यंत मराठ्यांसाठी लढवणार.. जरांगे पाटील
पंचाळे येथील " गंगांगीरी " सप्ताहास जरांगे यांची भेट !
वेगवान नाशिक / भाऊसाहेब र, हांडोरे
सिन्नर : दिनांक. १३ ऑगस्ट , मराठा आंदोलक , संघर्ष योद्धा श्री. मनोज जरांगे यांची सध्या महाराष्ट्रात दौरा सुरू असुन आज ते नाशिक येथील सभेला जात असताना सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील गंगांगीरी सप्ताहास जरांगे पाटील यांनी भेट दिली व महंत श्री रामगिरी महाराज यांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. तसेच महंत श्री रामगिरी महाराज यांनी श्री जरांगे पाटील यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांचे स्वागत केले..
गंगांगीरी ” सप्ताह कमिटी कडुन पंचाळे येथील माजी सरपंच श्री कैलाश थोरात यांच्या हस्ते श्री जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी नियोजन समितीचे अध्यक्ष संभाजी जाधव. राजेश गडाख . कैलाश थोरात . भाऊसाहेब सोणवणे. अरुण जाधव. यांसह सप्ताह कमिटी चे सर्व कार्यकर्ते. भाविक गण व मराठा समाजातील युवक व शेतकरी प्रचंड प्रमाणात उपस्थित होते…
मराठा समाजाला पुर्ण आरक्षण मिळाल्या शिवाय मी थांबणार नाही.. जिवात जीव असेपर्यंत मराठ्यांसाठी लढवणार.. मागे हटणार नाही.. मराठा हे कुणबी च आहे. त्यामुळे वेगळं काही आरक्षण देता कशाला.. सगेसोयरे व रक्ताची नाती यांचा ही कुणबी त समावेश करुन घ्यावी हि मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे… त्यासाठी हा लढा आहे… मनोज जरांगे पाटील ,,,
—- —- —– —- —- —
” सिन्नर ला मराठा आरक्षणासाठी उपोषण … ”
!! मनोज जरांगे यांना पाहण्यासाठी ग्रामीण भागातील सर्व समाजातील लोकांनी केली होती गर्दी !!
— — — — — — —- —
.. सिन्नरला समता परिषद तालुकाध्यक्ष राजेंद्र जगझाप व शहराध्यक्ष विशाल चव्हाण यांना पोलिसांकडून स्थानबद्ध … मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिक शांतता रॅली मुळे प्रशासनाची खबरदारी मात् समता परिषदेत रोष आणि निषेध लक्षात घेता पोलीसांनी ताब्यात घेतले व त्यांना स्थानबद्ध केले..
मराठा आंदोलक श्री मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज नाशिक येथे असल्याने त्यांचा जाण्याचा मार्ग सिन्नर मार्गे असल्याने हि खबरदारी घेण्यात आली .
मराठा समाजाला आरक्षण मिळावे.. सरकारी नोकरीत मराठा समाजातील तरुण युवकांना आरक्षणात आणावे.या मागणी साठी समता परिषद कार्यकर्ते व श्री . शरद शिंदे यांनी दोन दिवसांपासून तहसीलदार कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे.. श्री . शिंदे यांचा आज तिसरा दिवस असुन त्यांनी यापूर्वी या व अशा अनेक मागण्यांसाठी ” सरणावर ” बसून आंदोलन केले आहे..