वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला दि.१२ऑगस्ट:-राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील २९ बंधाऱ्यांची दुरुस्तीसाठी ३ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या बंधाऱ्यांची दुरुस्ती होणार असून येवला मतदारसंघातील सिंचन क्षेत्रात वाढ आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.
रेल्वे प्रवाशांना आता क्यूआर कोडद्वारे देता येणार तिकीटाचे पैसे
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील भाटगांव येथे स्मशानभूमी जवळील बंधारा दुरुस्ती करण्यासाठी १२ लाख, धानोरे येथे स्मशानभूमी जवळील बंधारा दुरुस्ती, अंगुलगांव येथे सिमेंट कॉक्रीट बंधारा दुरुस्ती, पिंपळगांव लेप येथे को.प बंधारा दुरुस्ती, बल्हेगांव येथे सिमेंट कॉक्रीट बंधारा दुरुस्ती,सावरगांव येथे आनंद काटे शेताजवळ सिमेंट कॉक्रीट बंधारा, कुसमाडी येथे येवले वस्तीजवळ सिमेंट कॉक्रीट बंधारा, कुसूर येथे कैलास गायकवाड शेताजवळ सिमेंट कॉक्रीट बंधारा, नायगव्हाण येथे जनार्दन ढोणे वस्तीजवळील सिमेंट कॉक्रीट बंधारा दुरुस्ती, पिंपळखुटे ३ येथे जगनराव मुंढे सिमेंट कॉक्रीट बंधारा, अनकुटे हजारे वस्ती सिमेंट कॉक्रीट बंधारा दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
कांद्याच्या भावात मोठी उसळी, कांदा पोहचला…एवढ्या पर्यंत ( व्हिडीओ )
येवला तालुक्यातील एरंडगांव दुकळे वस्ती बंधारा दुरुस्ती, एरंडगांव,खापरे वस्ती बंधारा दुरुस्ती, कासारखेडे येथे सिमेंट कॉक्रीट बंधारा दुरुस्ती, अनकाई येथे सिमेंट कॉक्रीट बंधारा दुरुस्ती, सावरगांव मोठा मळा खडी क्रशर जवळ सिमेंट कॉक्रीट बंधारा दुरुस्ती, भारम अशोक बेजुरकर सिमेंट कॉक्रीट बंधारा दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येकी ९ लाख ९० हजार, कुसमाडी येथे सिमेंट कॉक्रीट बंधारा दुरुस्ती, कुसूर गायकवाड वस्ती सिमेंट कॉक्रीट बंधारा दुरुस्ती करण्यासाठी ९ लाख ८० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
दीड एकर उत्पादनात शेतकरी झाला लखपती. वाचा किती व कोणत्या पिकाला मिळाला एवढा भाव
मुखेड येथे को.प बंधारा दुरुस्ती करण्यासाठी २४ लाख ८० हजार, कातरणी कदम वस्ती येथे सिमेंट कॉक्रीट बंधारा दुरुस्ती करण्यासाठी ९ लाख ७० हजार, खरवंडी येथे सिमेंट कॉक्रीट बंधारा दुरुस्ती करण्यासाठी ९ लाख ८५ हजार, जायदरे त्रिभुवन वस्ती येथे सिमेंट कॉक्रीट बंधारा दुरुस्ती करण्यासाठी ९ लाख ८५ हजार, चांदगांव येथे साठवण तलाव दुरुस्ती करण्यासाठी २५ लाख, दुगलगांव येथे को.प.बंधारा दुरुस्ती करण्यासाठी १५ लाख तसेच निफाड तालुक्यातील विंचूर चव्हाण वस्ती जवळ येथे साठवण बंधारा दुरुस्ती,विंचूर स्मशानभुमी जवळ साठवण बंधारा दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येकी २५ लाख, विंचूर (पुंड वस्ती) येथे साठवण बंधारा दुरुस्ती करण्यासाठी १० लाख, वनसगांव येथे साठवण बंधारा दुरुस्ती करण्यासाठी १५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये