60 वर्षाची महिला आणि हिस्त्र प्राण्याने हल्ला केल…अखेर..
वेगवान नाशिक / मनोज वैद्य
दहिवड, ता. 12 आॅगस्ट 2024 –
देवळा तालुक्यातील मेशी येथील चुलांगण शिवारातील एका वृद्ध महिलेवर शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याने ती महिला मयत झाल्याची घटना घडली आहे.
कांद्याच्या भावात मोठी उसळी, कांदा पोहचला…एवढ्या पर्यंत ( व्हिडीओ )
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मेशी येथील सुपडू गणपत शिरसाट हे आपल्या पत्नी कमळाबाई सह चूलांगण शिवार येथे शेतात राहतात. ते शनिवार दिनांक 10 रोजी दुपारी तीन वाजता आपल्या मुलीकडे दहिवड येथे गेले असता येथेच मुक्कामाला थांबले रात्री सदर महिला घरी एकटी होती दुसऱ्या दिवशी दि 11 रोजी सकाळी दहा वाजता महिलेचा पती घरी आल्यावर त्यांना झालेला प्रकार उघडकीस आला. मृत महिलेचे नाव कमळाबाई सुपडू शिरसाठ वय 61 असे आहे.
दीड एकर उत्पादनात शेतकरी झाला लखपती. वाचा किती व कोणत्या पिकाला मिळाला एवढा भाव
सदर महिलेच्या शरीरावर वन्य प्राण्याने हल्ला केल्याचे निशाण आढळून आले. स्थानिकांच्या मते सदर हल्ला बिबट्याने केला असावा असे सांगण्यात येत होते. मात्र या ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे कुठलेही ठसे आढळले नसल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. असे असले तरी वन्य प्राण्याच्या हल्ल्यात सदर महिला मृत झाल्याने मेशी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची