शेती

आता शेतक-यांच्या खात्यात पुन्हा पडणार हजारो रुपये,ते कसे घ्या जाणून

आता शेतक-यांच्या खात्यात पुन्हा पडणार हजारो रुपये Now thousands of rupees will again fall into the farmers' accounts


वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे

मुंबई दि.  महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे. या निवडणूकीच्या आगोदर मोठ्या मोठ्या घोषणा करुन राज्यसरकार मधील मंत्री मोकळे होतं आहे. आता शेतक-यांसाठी ही महत्वाची व आनंदाची बातमी म्हणता येणार आहे. कारण महाराष्ट्रातील शेतक-यांच्या खात्यात आता पुन्हा पैसे येऊन पडणार आहे. कारण शेतक-यांना मदत मिळावी म्हणून आता शेतक-यांना हेक्टरी 5000 रुपयांप्रमाणे पैसे खात्यावर टाकले जाणार आहे. असा निर्णय सरकारने घेतला आहे.

तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

सन 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक नाहरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

बहुचर्चित नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी ; चनकापूर उजव्या कालव्याला मिळणार हक्काचे पाणी

तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची

2023 च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनचे कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे, दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याच्या निर्णय घेतला आहे.

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यानां काय माहित १५०० रुपये ची किंमत.. अजित पवार

रस्त्याने सायरन वाजवतं जाणा-या आमदाराला एका पठ्याने गारचं केलं ( व्हिडीओ)

सदर रक्कम सोयाबीन- कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई-पीक पेऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी. यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक नाहरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे, जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरीत करता येईल असेही मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

रस्त्याने सायरन वाजवतं जाणा-या आमदाराला एका पठ्याने गारचं केलं ( व्हिडीओ)

नारपार नदी प्रकल्पाला मंजुरी, नाशिक व जळगावमधील तालुक्यांना पाणीचं पाणी

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!