रेस्ट कॅम्प रोडवरील खड्ड्यांमुळे देवळाली-भगूरवासियांनी केला रस्ता रोको
वेगवान नाशिक/Wegwan Nashik-११ ऑगस्ट :-
येथील रेस्ट कॅम्प रोडवर तयार झालेल्या खड्ड्यांमुळे ये-जा करतांना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने येथील रेस्ट कॅम्प रोडवरील नाका नंबर दोन परिसरात भगूर कॅम्प रस्ता त्रस्त नागरिक संघटनेच्या वतीने जन आंदोलन करण्यात येऊन रस्ता रोको, भीक मागून व खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड गेली अनेक वर्ष मागणी करूनही हा रस्ता तयार होत नसल्याने सार्वजानिक बांधकाम खाते व लोकप्रतिनिधिविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
मागील अनेक वर्षांपासून भगूर-देवळाली कॅम्प दरम्यान असलेल्या रेस्ट कॅम्प रोडवर हा वारंवार दुरुस्त करूनही पुन्हा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आमदार सरोज आहिरे यांच्यावतीने तीन दिवसांपूर्वी देवळाली भगूरमधील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन केले. सदर काँक्रिटीकरणासाठी कुठलीही वर्क ऑर्डर नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. आज रविवार दि. ११ रोजी सकाळी ११ वा. सुमारास भगूर देवळाली कॅम्प परिसरातील नागरिकांनी एकत्र येत सदर काँक्रीकरणाच्या कामाची वर्क ऑर्डर दाखवा, रस्ता बारा मीटर व उच्च प्रतीचा करावा, कामाच्या पूर्ततेची तारीख जाहीर करावी पर्याय असता उपलब्ध करून द्यावा संबंधित कंत्राट दाराला जनतेसमोर आणावे नियंत्रण करण्यासाठी स्थानिक समिती नेमावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी आंदोलन करणाऱ्यांपैकी हे तिघे खड्ड्यात उतरत अंगावर चिखलाचे पाणी ओतून घेत जनतेची दिशाभूल करणाऱ्या आमदार व सार्वजनिक बांधकाम खात्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलनात दीपक बलकवडे,चंद्रकांत कासार, वैभव पाळदे, मोहनीश दोंदे, रोहित कासार, काकासाहेब देशमुख, कैलास भोर, प्रमोद लासूरे, साहेबराव चौधरी, नितीन काळे, शाम देशमूख, ऍड. बाळासाहेब आडके, विक्रम सोनवणे, प्रमोद घुमरे, प्रवीण हासे, गोकुळ जाधव, मंगेश करंजकर, संभाजी देशमुख, प्रकाश गायकर, भाऊसाहेब गायकवाड,मनोज कुवर, प्रमोद मोजाड, योगेश करंजकर आदींसह भगूर व देवळाली कॅम्प येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी देवळाली कॅम्प पोलिसात रस्ता मंजूर नसतांना काम कसे काय सुरु केले असा सवाल करत सावर्जनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी, प्रभारी पोलिस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, उपनिरीक्षक सुरेश चौधरी, प्रवीण देवरे आदींची देवळाली कॅम्प पोलिस स्थानकात भेट घेत केली आहे.