नाशिक ग्रामीण

पर्यटकांना भुरळ घालणारा अंकाई किल्ला

पर्यटकांना भुरळ घालणारा अंकाई किल्ला


वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव

येवला 10ऑगस्ट 2024/श्रावणी सोमवारला मोठ्या प्रमाणात गर्दी

.नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध जोड किल्ले. अंकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. हे गाव येवला शहरापासून वीस किलोमीटर तर मनमाड शहरापासून ८ किमी अंतरावर, मनमाड-नगर रस्त्यावर आहे.अंकाई आणि टंकाई हे किल्ले
गिरिदुर्ग या श्रेणीत मोडतात. सातमाळ रांगेच्या दक्षिणेकडील फाट्यावर जेथून अजिंठा डोंगर रांगेची सुरुवात होते, तेथे अंकाई टंकाई किल्ले आहेत.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

नारपार नदी प्रकल्पाला मंजुरी, नाशिक व जळगावमधील तालुक्यांना पाणीचं पाणी

हे जोड किल्ले दोन स्वतंत्र डोंगरावर बांधलेले असून हे दोन डोंगर एका चिंचोळ्या खिंडीने जोडले गेलेले आहेत. अंकाई गावातून या जोडकिल्ल्यांकडे पाहिले असता डाव्या बाजूचा सर्वांत उंच डोंगर म्हणजे अंकाई किल्ला, तर उजव्या बाजूचा सपाट माथा असलेला डोंगर म्हणजे टंकाई किल्ला होय. अंकाई किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३१५२ फूट, तर टंकाई किल्ल्याची उंची २८०२ फूट आहे. येवला मनमाड शहरातून कोणत्याही खासगी वाहनाने अंकाई गावात सहज पोहचता येते. श्रावण महिन्यात दर सोमवारी मोठ्या प्रमाणात भावीक तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणात अंकाई किल्ल्यावर गर्दी करत असून तसेच अनेक भागातून श्रावण महिन्यात दिंड्या ही येथे दाखल होतात .

नारपार नदी प्रकल्पाला मंजुरी, नाशिक व जळगावमधील तालुक्यांना पाणीचं पाणी

सध्या ग्रामपंचायतच्या वतीने विविध सुविधा करण्यात आले असून पर्यटकांना अंकाई किल्ल्याची भुरळ पडत असून मोठ्या प्रमाणात पर्यटक अंकाई किल्ला पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे.

*********

किल्ल्याचा मध्यावर जैन लेण्या आढळून येतात,, त्यात अनेक ठिकाणी कोरीव व नक्षीकाम आढळून येते,भगवान महावीर यांची खंडीत मूर्ती सह असंख्य मुर्त्या आहेत,जैन भाविक व पर्यटक पण मोठ्या संख्येने वेरूळ व अजिंठा सारख्या लेण्या असल्याने बघण्यास गर्दी करतात,, नुकतेच इथे पुरातन खात्याकडे मागणी करून रेलिंग व नवीन पायऱ्या तसेच सरंक्षण भिंत व जाळ्या लावण्यात आल्या आहेत,, ठिकठिकाणी बसण्यासाठी बाक व कचराकुंड्या उपलब्ध केल्या आहेत,,

अंकाई किल्ल्यावर अगस्ती ऋषि यांची गुहा असून या गुहेत अगस्ती ऋषिचे मंदिर असुन हे पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. या गुहेच्या शेजारी थोड्या वरच्या बाजूस कड्याच्या पोटात खोदलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्यास बारमाही पाणी असते व हे पाणी पिण्यायोग्य आहे. इथू पुढे गेल्यावर अंकाई किल्ल्याचे विस्तृत पठार किंवा माची दिसते.पठाराच्या मध्यभागी एक खडकात खोदलेले पाण्याचे तळे
या तळ्याच्या मध्यभागी एक छोटी घुमटीवजा वास्तू आहे,हि अगस्ती ऋषी यांची समाधी आहे असे स्थानिक लोक मानतात.या तळ्यास काशीतळे असे नाव आहे. रामायण काळात अगस्ती ऋषी हे अंकाई डोंगरावर वास्तव्यास होते, अशी आख्यायिका
आहे.तलावापासून पुढे गडाच्या पश्चिम टोकावर एका मोठ्या वाड्याचे
अवशेष आहेत. आज या वास्तूच्या भिंती, कोनाडे, कमानी अवशेष रूपाने शिल्लक आहेत. या वाड्याच्या मध्यभागी एक विस्तीर्ण चौकोनी कोरडा हौद आढळून येतो. पूर्वी हा एक मोठा महाल असण्याची शक्यता आहे. याच वास्तूमध्ये एका टोकाला
पिराचे एक ठिकाण आहे,अंकाई किल्ल्यावर पाण्याचे तीन तलाव असून काही ठिकाणी खडकात पाण्याची टाकी कोरलेली आहेत.गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून पश्चिम दिशेला गोरक्षनाथ, कात्रा किल्ला तसेच हदबीची शेंडी असा परिसर दिसतो.

********

अंकाई ग्रामपंचायत च्या वतीने येणाऱ्या भक्त व पर्यटकांना आव्हान करण्यात येत आहे की किल्ल्यावर असलेल्या पाण्याचा तळ्यावर ज्यांना पोहता येत नाही त्यांनी जाऊ नये,काही ठिकाणी विकासकामे चालू आहे तिथं सावध राहावे,गावात पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे,,किल्ल्यावर व मार्गात जागोजागी कचराकुंड्या लावलेल्या आहेत कचरा त्यातच टाकावा व निसर्गाचे रक्षण करत आनंद घ्यावा

अलकेश कासलीवाल
संस्थापक अध्यक्ष माणुसकी फाउंडेशन येवला
सदस्य ग्रामपंचायत अंकाई

****
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवानेते अलकेश कासलीवाल यांच्या सततच्या पाठपुरावा व मा नामदार भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपये खर्चून पुरातन खात्याचा माध्यमातून पायऱ्या,कठडा तसेच किल्ल्यावर असलेल्या सरंक्षण भिंती व ढासळलेले बुरुज चे कार्य प्रगती पथावर असून लेण्यावर सर्व काम पूर्ण झालेले आहे,भक्तनिवास व पायथ्या पर्यंत कॉंक्रिट रस्ता झालेला आहे,

पर्यटक गिर्यारोहक व भक्त या तिन्ही प्रकारच्या पाहुण्यांना अंकाई किल्ला नेहमीच भुरळ घालतो अन आता तिथं नटलेली हिरवळ सर्वांना खुणावत आहे

********

या आधी ऐन यात्रोत्सव काळात पावसाळ्यात रेल्वे पुलाखाली एक ते दीड फुटपर्यंत पाणी साचायचे अन येणाऱ्या जाणाऱ्याचे हाल व्हायचे,पर्यटक, विद्यार्थी, शेतकरी भक्त सर्वांचेच रहदारी बंदच व्हायची,परंतु भुजबळ साहेबांच्या माध्यस्थतीने रेल्वे विभागाची परवानगी घेऊन गावातील तरुण मित्र अलकेश कासलीवाल, किरण बडे, सचिन वैद्य,सागर सोनवणे,संतोष टिटवे,बाळू चव्हाण, प्रितम वैद्य आदि मित्रांनी ७० वर्षापासूनच हा प्रश्न स्व खर्चाने मार्गी लावला व आता तिथं कितीही ह
पाऊस आला तरी पाणी थांबत नाही,,या गोष्टीचा सगळीकडून आनंद व्यक्त आहे व अभिनंदन ही करत आहे,

फोटो ….पर्यटक गिर्यारोहक व भक्त या तिन्ही प्रकारच्या पाहुण्यांना अंकाई किल्ला नेहमीच भुरळ घालतो अन आता तिथं नटलेली हिरवळ सर्वांना खुणावत आहे.. छायाचित्र.. अमोल वैद्य


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!