नाशिक शहर

बहुचर्चित रेस्ट कॅम्प रोडच्या काँक्रिटीकरण सुरूवात

वाहनधारक नागरिकांची गैरसोय टळणार


वेगवान नाशिक/Wegwan Nashik-

10 ऑगस्ट, विशेष प्रतिनिधी –

येथील भगूर देवळाली कॅम्प दरम्यान असणाऱ्या रेस्ट कॅम्प रोडवर जागोजागी खड्डे निर्माण झाल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या पाच कोटी रुपये निधीच्या कामाचे काल शुक्रवार दि.९ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करत प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

नारपार नदी प्रकल्पाला मंजुरी, नाशिक व जळगावमधील तालुक्यांना पाणीचं पाणी

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आ.आहिरे यांनी देवळाली कॅम्प भगूर-पांढुर्ली रस्त्याची परिस्थिती खूपच दयनीय झाल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद केली होती. या कामाचे काल येथील प्रतिष्ठित नागरिक उत्तमराव कासार, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड, सचिन ठाकरे, तानाजी करंजकर,दोनवाडे येथील सरपंच अशोक ठुबे विलास धुर्जड, दीपक बलकवडे सुरेश कदम, आर.डी. जाधव,भगूर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख,संसरीचे सरपंच विनोद गोडसे, अंबादास कस्तुरे, शाम ढगे, चंद्रकांत कासार,पंडीत साळवे,गौतम भालेराव,भारत वाघमारे, सोनू रामवानी आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवत काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

मी आता ऐश्वर्या रायला सोडचिठ्ठी देणार, पहा काय घडलं नेमकं

रेस्ट कॅम्प रोडवर वरील सप्लाय डेपो पासून पुढे ७ मीटर रुंदीचे १३०० मीटर लांबीचे खडीकरण व कॉंक्रिटीकरणाच्या कामास लागलीच सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड यांनी सांगितले की आजपर्यंत एकाही आमदारांनी या रस्त्याच्या निर्मिती कामी निधी उपलब्ध करून दिला नव्हता मात्र आमदार आहिरे यांनी या रस्त्या कमी वेळोवेळी पाठपुरा करत आधी एक कोटी तर आता पाच कोटी निधी उपलब्ध करून दिल्याने तब्बल ५२ गाव खेड्यातील नागरिकांचे या रस्त्याने ये-जा करणे सोयीचे होणार आहे.

आता पावसाची दडी, या तारखेला पुन्हा सुरु होणार कोसळधारा

आमदार सरोज आहिरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की रस्त्याचे काम सुरू असताना स्थानिक व आजूबाजूच्या गाव खेड्यातील नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे मोठी वाहने बाण स्कूल रोड मार्गे देवळालीकडे ये जा केल्यास कामास गती मिळणार असल्याचेही नमूद केले.

येवल्याचा झालेला सर्वांगीण विकास कुणीही नाकारू शकत नाही – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार*


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!