वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला दिनांक 10आगस्ट,येवला तालुक्यामध्ये शिवसेना तालुक्याच्या वतीने आगळीवेगळी आदिवासी जयंती साजरी करण्यात आली येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील व यांच्या सहकाऱ्यांनी तालुक्यातील गुजरखेडे येथील आदिवासी कुटुंबातील अंजनाबाई बर्डे यांचे ७ दिवसापूर्वी अचानकपणे निधन झाले होते म्हणून येथील ग्रामस्थांनी सालाबादप्रमाणे साजरी होणारी आदिवासी जयंती साजरी न करता कुटुंबांच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला नसला तरी त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय आपण घेऊ आणि त्यांच्या दुःखात सहभागी होऊ त्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना डी.बी.शेळके पाटील फाउंडेशन च्या वतीने साडीचोळी मिठाई घेऊन त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन पर भेट दिली.जगभरात दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा केला जातो. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावलेल्या जगभरात राहणाऱ्या आदिवासींचा सन्मान करण्यामागे या दिवसामागे एक खास कारण आहे.केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आदिवासी समाजाचे लोक राहतात.ज्यांची जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि चालीरीती सामान्य लोकांपेक्षा भिन्न आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटल्यामुळे आदिवासी समाज आजही मागासलेला आहे. त्यामुळेच भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी आज 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो.संयुक्त राष्ट्र महासभेने पहिल्यांदा 1994 हे आदिवासी लोकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते. आदिवासी समाजाचे देखील उन्नती होऊन एका चांगल्या प्रवाहामध्ये या समाजाने यावं या यंतूने आज राज्यभर हा आदिवासी दिन साजरा केला जातो. तालुक्यामध्ये देखील आदिवासी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जाते या तालुक्यामध्ये आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील गुजरखेडे येथे जवळपास 400 ते 500 लोक वस्तीचा हा समाज तेथे वास्तव्याला असणाऱ्या अंजनाबाई दगु बर्डे हे त्यांच्या कुटुंबप्रमुख होत्या परंतु त्यांच्या अचानकपणे निधन झाल्यानंतर संपूर्णपणे कुटुंब उघड्यावर पडले आहे त्यामुळे बर्डे यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या या दुःखामध्ये संपूर्ण गुजरखेडे आणि परिसर सहभागी झाला आहे गुजरखेडे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये आदिवासी जयंती साजरी होती परंतु अंजनाबाई बर्डे यांच्या निधनानंतर आज तिथे कुठलाही उत्सव साजरा करण्यात आला नाही संपूर्ण गावाने दुखावटा पाळला होता. दरवर्षीप्रमाणे येथील शिवसेनेचे तालुका प्रमुख त्यांच्या जयंतीला भेट देणार होते परंतु तेथील शिवसेनेचे रावसाहेब पारखे यांनी गावात दुःखद घटना घडली आहे त्यामुळे जयंती साजरी होणार नाही असे सांगितले लगेचच तालुकाप्रमुख शेळके यांनी आपण त्यांच्या दुःखात सहभागी होऊ असे सांगितले तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्या कुटुंबाला भेट दिली कुटुंबातील असणाऱ्या व्यक्तींना महिलांना साडी चोळी तसेच पुरुषांना देखील कापडं खरेदी करून मिठाईच्या अनेक वस्तू देऊ त्यांच्या कुटुंबाला सांत्वन पर भेट दिली यावेळी शेळके आणि त्यांचे सहकारी त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी गेले असता त्यांच्या भावना दाटून आल्या त्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले आणि आजवर आमची कोणीच काळजी न करता सतत आम्हाला दुर्लक्षित ठेवलं आपण येऊन आमच्या कुटुंबाचे सांत्वन केले आजवर असं कधीच घडलं नाही त्यामुळे आम्ही तुमचे व तुमच्या शिवसेना पक्षाचे तसेच डी.बी.शेळके पाटील फाउंडेशन चे आभार मानतो असे त्या कुटुंबांनी सांगितले. यावेळी येथील शिवसेनेचे रावसाहेब पारखे,सामाजिक कार्यकर्ते जगदीश बोराडे,शिवसेना पाटोदा गटाचे गणप्रमुख सागर गायकवाड, निलेश धीवर,नारायण गुजर,रामेश्वर मोकळ,विलास होन,दत्तू होन, योगेश चव्हाण,अण्णासाहेब जावळे,सोमनाथ चव्हाण, बाळासाहेब बच्छाव,नाना पवार,बाबासाहेब पवार,श्रावण पवार,गोकुळ पवार,रघुनाथ पवार, कर्ण बर्डे,दगू बर्डे.यांच्यासह अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया….
आदिवासी समाजाला योग्य प्रवाहात आणण्यासाठी नुसते दिन साजरे करून चालणार नाही तर प्रत्यक्ष त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे लागेल वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाक्यानुसार 20% राजकारण आणि 80 टक्के समाजकारण हे डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काम करत आहे.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही देखील तालुक्यात काम करत आहोत. म्हणूनच आम्ही आज आदिवासी दिनाचे औचित्य साधत अंजनाबाई बर्डे यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झालो.
पांडुरंग शेळके पाटील
शिवसेना तालुकाप्रमुख येवला.
प्रतिक्रिया….
दरवर्षीप्रमाणे आम्ही आमच्या गावामध्ये मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा करतो परंतु आमच्या गावामध्ये अंजनाबाई बर्डे यांचे निधन झाल्यामुळे यावर्षी आम्ही दिन नसाजरा करण्याचा निर्णय घेतला होता.आज आमच्या कुटुंबाला येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन आमच्या कुटुंबाला जी मदत दिली आणि कुटुंबाला दुःखातून बाहेर येण्याचा जो आधार दिला तो आमच्यासाठी अविस्मरणीय आहे शेळके पाटील यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी आमच्या आदिवासी बांधवांकडून शुभेच्छा देतो.
दगु बर्डे गुजरखेडे…..
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये