वीर एकलव्य यांची एकाग्रता, वीरता आणि शुरता सर्वांसाठी आदर्श – मंत्री छगन भुजबळ*
वीर एकलव्य यांची एकाग्रता, वीरता आणि शुरता सर्वांसाठी आदर्श - मंत्री छगन भुजबळ*

वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला ,दि.९ ऑगस्ट:- वीर एकलव्य यांची एकाग्रता, वीरता आणि शुरता सर्वांसाठी आदर्श आहेत. येवला शहरात आपण विविध स्मारके उभारली असून योग्य त्या जागेवर येवल्यात भगवान वीर एकलव्य यांच्यासह आदिवासी क्रांतीकारकांचे स्मारक उभारू असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
कांद्याबाबत सरकार घेणार मोठा निर्णय
वीर एकलव्य जयंती व जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज येवला शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा शुभारंभ मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मोहन शेलार, मकरंद सोनवणे, सचिन सोनवणे, गोटू मांजरे, विजय जेजुरकर, पार्थ कासार, गणेश गवळी एकलव्य मिरवणुकीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह एकलव्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कांद्याबाबत सरकार घेणार मोठा निर्णय
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी बांधवांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरोधात लढाई लढली.वीर एकलव्य यांनी गुरूचा पुतळा उभारून त्यांनी धनुर्विद्या प्राप्त केली. त्यांची एकाग्रता वीरता शुरता सर्वांना आदर्श आहे. त्यांचा हा आदर्श समाजात रुजावा यासाठी येवल्यात भगवान वीर एकलव्य यांच्यासह आदिवासी क्रांती कारकांचे स्मारक उभारण्यात येईल असेही ते म्हणाले.
कांद्याबाबत सरकार घेणार मोठा निर्णय
ते म्हणाले की, महायुती सरकारने मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांनी आपल्या मुलींना शिकवून मुख्य प्रवाहात आणावे. युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. त्यातून युवकांनी कौशल्य आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यांना पक्के घरे बांधून देण्यासाठी शासनाने भरीव अशी तरतूद केली आहे. त्यामुळे झोपड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांना पक्के घर बांधून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करून सादर करण्यात येऊन त्यांना पक्के घरे बांधून द्यावेत अशा सूचना त्यांनी केल्या.
कांद्याबाबत सरकार घेणार मोठा निर्णय
ते म्हणाले की, मतदारसंघातील ज्या आदिवासी बांधवांकडे रेशन कार्ड नाही अशा सर्व आदिवासी बांधवांसाठी रेशन कार्ड शिबिर सुरू करण्यात येऊन रेशनकार्ड चे वाटप करण्यात येत आहे. रेशन कार्ड सोबतच आदिवासी जातीचे दाखले उपलब्ध होण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात येऊन दाखल्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर आदिवासी बांधवांसाठी शासनाकडून ज्या विविध योजना राबविण्यात येत आहे. त्या योजनांचा लाभ देखील मिळवून देण्यासाठी आपलं काम सुरू असून यापुढील काळातही आदिवासी बांधवांच्या विकासासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी आपले काम अविरत सुरू राहील असे त्यांनी सांगितले.
*क्रांती दिनानिमित्त मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून क्रांतीस्तंभासह स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांना विनम्र अभिवादन*
दि.९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहरातील आझाद स्मारकातील क्रांतीस्तंभ व सेनापती तात्या टोपे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत क्रांतीकारांना विनम्र अभिवादन केले.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये