” गंगांगीरी ” महाराज १७७ व्या फिरत्या नारळ सप्ताहाचे उद्या पासून प्रारंभ…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार " गंगांगीरी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन..
वेगवान नाशिक / भाऊसाहेब र, हांडोरे
सिन्नर : दिं.९ ऑगस्ट २०२४ सिन्नर तालुक्यातील शहा – पंचाळे येथे महंत रामगिरी महाराजांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली ह.भ.प. गंगांगीरी महारांजांचा महाकुंभ सप्ताहाचे आयोजन केले असून तब्बल बारा वर्षे च्या प्रदिर्घ मागणी व प्रतिक्षेनंतर सिन्नर तालुक्याला मान मिळाला आहे या बहुचर्चित महाकुंभ १७७ व्या फिरत्या नारळ सप्ताहाचा प्रारंभ शनिवार दिनांक १० ऑगस्ट पासून होणार आहे…
या वारकरी महाकुंभ सप्ताह दरम्यान ” गंगांगीरी ” कृषी प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. आठ दिवस चालणार्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सह शेजारील तालुक्यातील आमदार हि या सोहळ्याला उपस्थितीत लावणार आहे.अशी माहिती सप्ताह समितीचे वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पत्रकात दिली आहे .
” मराठा नेते श्री मनोज जरांगे यांची उपस्थिती लक्षणीय ”
या सप्ताहा दरम्यान मराठा समाजाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील हे दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता महंत रामगिरी महाराजांचे आशिर्वाद घेणार असल्याचे सप्ताह निय़ोजन समितीचे अध्यक्ष संभाजी जाधव यांनी सांगितले आहे. श्री.जरांगे यांची छावा संघटनेचे अध्यक्ष रमेश आप्पा पांगारकर यांनी प्रत्यक्षात भेट घेऊन या सप्ताहा ला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते .!! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून महाप्रसाद !!
**** ****** ****
या सप्ताहा दरम्यान एकादशीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परिवारातर्फे साबुदाणा खिचडी चा महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे तर मंडप सौजन्य आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कडून करण्यात येणार आहे.
या सप्ताहा साठी खा.राजाभाऊ वाजे यांच्या परिवाराकडून मोलाचं योगदान लाभत आहे..
!! भजन, कीर्तन, प्रवचन व भोजन सप्ताह चे खास वैशिष्ट्ये !!
सप्ताह च्या पहिल्या च दिवशी सिन्नर तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व ५१ गावांपैकी प्रत्येक गावातील ” पुरणपोळी चा महाप्रसाद आणणार आहे तर नांदगाव व येवला तालुक्यातील सर्व गावां मिळुन ” मांडे, पुरणपोळीचा महाप्रसाद आणणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मागील आठवड्यात डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली असून त्यात त्यांनी हि माहिती दिली. या बैठकीत नियोजन समितीचे अध्यक्ष संभाजी जाधव, सांगविचे सरपंच विनायक घुमरे, पचांळेचे माजी सरपंच श्री कैलाश थोरात,ह.भ.प. शिवाजी महाराज तळेकर,ह.भ.प. ओम् महाराज गवळी, अरुण थोरात,हे.भ.प.किशोर महाराज खरात, नवनाथ मुरडणर, पत्रकार प्रभाकर बेलोटे, नवनाथ गडाख, तानाजी लमखेडे, अशोक बोराडे, आनंद थोरात, मधुकर महाराज, प्रसाद महाराज कानडे, ज्ञानेश्वर पांगारकर, महेश थोरात, आदिंसह शेकडो भाविक उपस्थित होते.
गंगांगीरी कृषी प्रदर्शनात उद्घाटनप्रसंगी खा.राजाभाऊ वाजेंसह शेजारील तालुक्यातील आमदार दिलीप बनकर ( निफाड तालुका ), आशुतोष काळे ( कोपरगाव तालुका ) , सरोजताई अहिरे, ( नाशिक रोड )जिल्हा परिषद सदस्य सिमिंतिनी कोकाटे, छावा संघटनेचे अध्यक्ष रमेश आप्पा पांगारकर.आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत,
!! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे -जन सन्मान यात्रा !!
सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान यात्रा सुरू असुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी बारा वाजता ” शेतकरी हितगुज ” मेळावा ज्वालामाता लॉन्स सिन्नर तर “कामगार हितगुज ” मेळावा लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आल्याचे सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एकुण तीन कार्यक्रम असुन ते वेगवेगळ्या तीन ठिकाणी आहे..याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सिमिंतिनी कोकाटे यांनी केले आहे..