तीन तालुक्यात आदिवासी शेतकर्यांना लाखो रुपयांना गंडवणार्या तोतया पत्रकार संदिप अवधुत याचा अटकपुर्व जामीन फेटाळला
जिल्हा न्यायालयाचा दणका
वेगवान नाशिक/सागर मोर
वणी – दिंडोरी ,कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकर्यांना विविध अमिष दाखवुन लाखो रुपयांना गंडा घालण्याचा आरोप असलेल्या संदिप अवधुत याचा अभोणा पोलिस ठाण्यात दाखल ठकबाजीच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने अटक पुर्व जामिन फेटाळल्याने अवधुत याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.शेतजमीनीची वारस नोंद ,कब्जा घेऊन देतो ,सबसिडीत ट्रॕक्टर घेऊन देतो या व अशा प्रकारची अमिषे या तीन तालुक्यातील आदिवासीना दाखाविली.तसेच पत्रकार ,वकील,मानवअधिकार परीषदेचा पदाधिकारी असल्याचे भासवत लाखो रुपयांना गंडा आदिवासी शेतकर्यांच्या अज्ञानाचा व भोळेपणाचा फायदा घेत अवधुत याने घातल्याच्या तक्रारी सुरगाणा ,कळवण व दिंडोरी तालुक्यातील पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.एकुण पाच तक्रारी पैकी अभोणा येथे सखोल चौकशी अंती अवधुत विरोधात शेतकर्याची दिड लाख रुपयांची फसवणुक केल्याच्या फिर्यादीवरुन ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर अभोणा पोलिसांनी वणी येथील दत्तनगर येथील त्याचे घरी जाऊन नोटीस दिली होती.त्यावेळी अवधुत हा त्यापुर्वीच परागंदा झाला होता.चौकशी कामी असहकार्याची भुमिका घेतल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती.या दरम्यान या गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अवधुत याने अटक पुर्व जामिन अर्ज दाखल केला होता.अवधुत याचे वकील व सरकारी वकील यांच्यात याबाबत युक्तीवाद झाला मात्र महत्वाची भुमिका ठरली ती अभोणा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांची अवधुत याचा गुन्हेगारी वृत्ती चा पुर्वइतिहास याबाबत गुन्हा दाखल करताना केलेली सखोल पडताळणी ,तसेच विविध पोलिस ठाण्यात त्याचे विरोधात येत असलेल्या गंभीर तक्रारी याबाबत तक्रारदार यांना न्याय मिळवुन देण्यासाठी तसेच अशा प्रकारामागे अजुन कोणी टोळी आहे किंवा कसे तसेच आदिवासी शेतकर्यांच्या आर्थिक शोषणाची व्याप्ती मोठी असु शकते या सर्व बाबी तपशीलवार व मुद्देसुद पणे मांडल्या.न्यायालयाने याची पडताळणी व गांभीर्य लक्षात घेता ठकबाज व तोतया संदिप अवधुत याचा अटकपुर्व जामीन फेटाळल्याने त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.दरम्यान अभोणा पोलिस अॕक्शन मोडमधे आले असुन अवधुत याला लवकर गजाआड टाकण्याची प्रक्रीया गतिमान झाली असुन सोशल मिडीयावर अवधुत याच्या समर्थनार्थ पोस्ट करणारांचे धाबे दणाणले असुन या प्रक्रीयेत कोणा कोणाच्या संपर्कात आहे याची सखोल माहीती संकलीत करुन योग्य त्या कायदेशीर कारवाईची पुर्तता करण्यासाठी अभोणा पोलिसांनी पाऊले उचलली आहेत.