नाशिक क्राईम

लाखोचा मुद्देमाल हस्तगत ! चोरांच्या आवळल्या मुसक्या ! घोटी पोलिसांची कामगिरी!


वेगवान नाशिक / उत्तम गायकर

 

नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये मोटरसायकल चोरी करणारे आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली. १८जूनला घोटी पोलीस ठाणे हद्दीतील अंबुचीवाडी परिसरातून २ मोटरसायकली चोरी गेल्या बाबत घोटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर ३०४/२४ भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पो. कॉ. प्रकाश कासार यांना मिळालेल्या गुप्त माहितीचे आधारे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरातून आरोपी पृथ्वीराज भुलेश्वर जंगम वय १९ रा. घोटी ता. इगतपुरी याला ताब्यात घेऊन वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली. सदर आरोपीने त्याचे साथीदारासह वरील गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीच्या एक्सेस मोपेड, टीव्हीएस स्टार या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या. सदर आरोपीस विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह आणखी मोटरसायकली चोरी केल्याचे उघड झाले. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हाचे समांतर तपास आरोपी राजेश दगडू मोरे वय २५ रा. फुलवाडी ता. आंबेगाव जि. पुणे सध्या म्हाळुंगे एमआयडीसी जि. पुणे यास ताब्यात घेऊन विश्वासात घेतलेले दोन्ही आरोपी पृथ्वीराज जंगम व राजेश मोरे यांनी त्यांच्या आणखी दोन साथीदार यांचे नाशिक जिल्ह्यातील घोटी, इगतपुरी, वाडीव-हे,

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

सिन्नर, तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर, खडकपाडा, यांसह पुणे जिल्ह्यातील आंबेठाण, महाळुंगे, एमआयडीसी आळेफाटा, मंचर या ठिकाणी महागड्या मोटारसायकली चोरी केल्याचे कबूली दिली आहेत. सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले असून जप्त केलेल्या मोटरसायकली आरोपीच्या कब्जातून वीस मोटरसायकल किंमत १४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपींना घोटी पोलीस स्टेशन गुरनं ३०४ ऑब्लिक २५४ भादवी कलम ३७९ या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहे. स्थानिक नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने इतर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी करणारे आरोपीचे रॅकेट उघडकिस आणून कारवाई केली असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे घोटी पोलीस स्टेशनचे निरीक्षक विनोद पाटील, स्थागुशाखेचे गणेश शिंदे , विनोद टिले, प्रकाश कासार, संदीप झाल्टे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम पोलीस स्टेशनचे पो.हवा लक्ष्मण धकाते योगेश यंदे यांचे पथकाने मोटारसायकल चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली असून सर्वच स्तरांतून घोटी पोलिसांचे अभिनंदन होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!