द्राक्षे निर्यातदाराकडून शेतकऱ्यांची चौदा लाखाची फसवणूक; लासलगाव पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल
वेगवान नाशिक/ किरणकुमार आवारे
८ ऑगस्ट /शिरवाडे वाकद
:- निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव व मरळगोई खुर्द येथील शेतकऱ्यांकडून निर्यातक्षम द्राक्षे माल खरेदी करून तब्बल १४ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मध्यस्थ व निर्यातदार यांचे विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कांद्याचे भाव गाठणार एवढा आकडा
याबाबत ज्ञानेश्वर वाळु रायते वय ४७ रा.खडकमाळेगाव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची शेत ग.न.३७४ मध्ये अडीच एकर जमीन असून त्यात पाच वर्षांपूर्वी द्राक्षे लागवड केली आहे. दि.५ जाने.२४ रोजी व्यापारी आरोपी पुर्वा अनिल चव्हाण रा.औद्योगिक वसाहत, महर्षीनगर पुणे, सुरज भिमराव कांबळे रा गणेश दर्शन क्र.३ आपटेवाडी बदलापुर इस्ट, वामसी कृष्णा गाजीथला रा.तिरुपती, आंध्रप्रदेश, तेजल अनिल चव्हाण, औद्योगिक वसाहत, पुणे मार्केट यार्ड हे आमचे द्राक्षे पाहणीस आले होते. तेजल चव्हाण यांनी आम्ही आपले शेतातील द्राक्षे खरेदीस इच्छुक असून इतर तीन आरोपीं व शेतकरी दतात्रय भाऊसाहेब कोकणे, बापु अशोक रायते यांचे समक्ष सर्व व्यवहार चेक व बाकी रोखीने करु असे सांगुन दोन्ही बागेचा ७३ व ५२ रु.प्रतिकिलो ने भाव ठरवला. त्यानंतर आरोपींनी दि.१५ जाने ते दि.२१ फेब्रु. याकाळात माझे कुटुंबातील सदस्य व इतर मजुरांच्या सहाय्याने एक्सपोर्ट युनायटेड फ्रेश इंडिया द्राक्ष कंपनीने खुडा करुन त्यांचे वाहनात घेऊन गेले.
माझ्या एकूण ७,६५,८०३ द्राक्षे मुल्यापैकी ५० हजार बँकेत जमा करून उर्वरित ७,१५,७७३ रु.चा.पूर्वा चव्हाण यांची सही असलेला कॅनरा बँक नाशिकचा धनादेश दिला. मी २६ जून रोजी बँकेत धनादेश टाकला असता खात्यावर पैसे शिल्लक नव्हते व पूर्वा चव्हाण यांचा मोबाईल बंद आढळून आला.
बापु अशोक रायते रा. खडकमाळेगाव यांचे द्राक्ष बागेच्या एकूण ३,८१,५४१ व मरळगोई खु.ता.निफाड येथील छबु महादु फापाळे यांचे ३,३५,८११ रुपये द्राक्षे मुल्यापैकी त्यांना एक रुपया देखील मिळाला नाही. त्यामुळे आमची फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने आरोपी पूर्वा चव्हाण व सूरज कांबळे यांनी वामसी कृष्णा गाजीथला व अनिल चव्हाण यांच्या मदतीने आमचे कडील द्राक्ष माल खरेदी करुन आमची १४,३३,१२५ रुपयांची माझी व साक्षीदार यांची आर्थिक फसवणुक करुन विश्वास घात केला आहे .
म्हणुन आरोपी महिलेच्या विरोधात फिर्याद देत आहे असे म्हटले आहे. त्यांचे फिर्यादी वरून लासलगाव पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि.भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ऊ.नि.किशोर पवार अधिक तपास करीत आहेत.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.