कांद्याचे भाव गाठणार एवढा आकडा
कांद्याचे भाव गाठणार एवढा आकडा A figure that will reach the price of onion

वेगवान नाशिक
नाशिक, ता. नाशिक जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कांद्याचे उत्पन्न हे कमी झाले त्यामुळे शेतक-यांना थोड्या फार प्रमाणात पैसे मिळावे अशी शेतक-यांची अपेक्षा आहे. मात्र कांद्याची परिस्थिती पाहता लाल कांदा बाजारमध्ये येण्यास अजून अवधी असल्यामुळे उन्हाळ कांद्या चांगला भाव खाऊन जाणार आहे. A figure that will reach the price of onion
कांद्याबाबत सरकार घेणार मोठा निर्णय
कांद्याचा बाजार टिकून
देशातील बाजारात वाढलेल्या भावात कांद्याला उठाव काहीसा कमी झालेला असला . त्याचा दरावरही परिणाम दिसून नाही. कांद्याचा भाव ३ हजारांच्या पातळीवरून गेल्या दोन आठवड्यात कायम आहे. सध्या कांदा 1900 रुपये 3000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कांद्याची निर्यात किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कामुळे कमी झालेली आहे. तरीही कमी पुरवठा आणि मागणी यामुळे कांदा बाजारातील दराची स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.
कांद्याबाबत सरकार घेणार मोठा निर्णय
जर कांद्याची मागणी अजून वाढली तर कांद्याचे भाव पुन्हा वाढतील असेही बोललं जात आहे. कांद्याचे भावाची जर स्थिती पाहिली तर काल नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील बाजार समितीमध्ये कांद्याला 3250 रुपये भाव मिळाला होता. आज 100 रुपयांनी भाव कमी झाल्याचे पाहावयास मिळत असेल तरी काल सटाणा येथील बाजार समितीमध्ये कांद्याला 28 रुपये भाव मिळत असतांना आज तेथील भाव वधारुन ते 3000 पर्यंत जाऊन पोहचले आहे.
कांद्याबाबत सरकार घेणार मोठा निर्णय
कांद्याचे गणित हे मागणी आणि पुरवठा तसेच उत्पादन याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर कांद्याचे भाव हे 4000 हजाराचा टप्पा गाठू शकतात अथवा तशी परिस्थिती ओढवली तर कांद्याचे भाव या भावपेक्षाही कमी होऊ शकतात अशी परिस्थिती आहे.
कांद्याबाबत सरकार घेणार मोठा निर्णय
