नाशिक ग्रामीणशेती

शेतकऱ्यांची लाखो रुपयांची कर्जमाफी होणार का? आज मंत्रिमंडळात मोठा निर्णय

शेतकऱ्यांची लाखो रुपयांची कर्जमाफी होणार का? आज मंत्रिमंडळात मोठा निर्णय


 

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव

येवला दिनांक /7ऑगस्ट 2024,महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची घोषणा करत आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ती म्हणजे कर्जमाफीची योजना. या बातमीने राज्यातील शेतकरी वर्गात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे

 

 

.मागील सरकारने दोन लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफ केले त्यानंतर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटपाचे काम केले पण दोन लाखाच्या वरील कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ न झाल्याने हजारो थकबाकीदार शेतकऱ्यांचे व्याज अव्वाच्या सव्वा वाढल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आलेला आहे

,त्यातच अतिवृष्टी, दुष्काळ,शेती मालाला मिळत असलेला मातीमोल भाव यामुळे दिवसेंदिवस शेतकरी अडचणीत येत असून मोठ्या प्रमाणात थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे सरकारने दोन लाखाच्या वरील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

तसेच जिल्हा बँकेसह ,राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात दोन लाखाच्या वरील शेतकरी कर्जमाफी च्या आशेवर बसल्याने अव्वाच्या सव्वा व्याज दर वाढत चालल्याने शेतकरी प्रचंड संतप्त झाले आहेत.

सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सन २००८ ते २०१५ या कालावधीतील दीड लाखापर्यंत कर्ज माफ केले.

सन २०१६-१७ ला जिल्हा बँकेने वाढीव कर्ज दिल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी आर्थिक टंचाईशी झगडत जुने कर्ज भरून नवीन कर्ज उचलले

मात्र सन २०१६-१७ मध्ये पीक कर्ज उचल केलेले शेतकरी चालू कर्जदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीपासून वंचित राहिले. सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत सन २०१६ ते २०१९ या काळातील दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केले.

यात ज्यांचे दोन लाखापर्यंत व्याजासह कर्ज होते त्यांना कर्जमाफीचा लाभ झाला. नाशिक जिल्ह्यात, कांदा, द्राक्षे उत्पादक शेतकरी जास्त असल्याने दोन लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र सरकारने विधानसभेत घोषणा करूनही दोन लाखावरील कर्जमाफी सरकारच्या खिजगणतीतही राहिली नाही.

त्यामुळे आता शिंदे, अजित दादा,फडणवीस सरकारने दोन लाखाच्या वरील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांचे अश्रू पुसावे अशी मागणी शेतकरी करत आहे . मागील दोन-तीन वर्षापासूननाशिक जिल्ह्यातील द्राक्षे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोरोना, अतिवृष्टीचा फटका बसला असून कांदा,द्राक्ष मातीमोल भावात विकावे लागले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जे शेतकरी दोन लाखावरील कर्जाची रक्कम अदा करण्यास तयार आहेत त्यांच्यासाठी मात्र सरकारकडून कुठलीही हालचाल नाही. त्यामुळे दोन लाखावरील कर्ज वसुली करून दोन लाख रुपयांची सरकारने हमी घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया,,

२०१९/२० मध्ये महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजनेत दोन लाखा पर्येतचे कर्ज माफी झाली, पंरतु दोन लाखावरील जे कर्जदार शेतकरी २०१६ ला ही कर्ज माफी पासुन वंचित राहीले व २०१९/२० लाही वंचित राहीले. तरी शिंदे व फडणवीस, अजित दादा सरकारणे या कर्ज माफी पासुन वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ किंवा बॅके मार्फत सेटलमेंट करून या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा.

सुनील देशमुख शेतकरी सायगाव ता येवला


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!