लाडकी बहिणीच्या खात्यात पहिला हप्ता या तारखेला जमा होणार मुख्यमंत्री शिंदेंनी तारिख सांगितली
लाडक्या बहिणीचा खात्यात पहिला हप्ता या तारखेला जमा होणार मुख्यमंत्री शिंदेंनी तारिख सांगितली
वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
मुंबई, ता. 7 जुलै 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. chief-minister-shinde-tarikh-said-that-the-first-installment-in-the-account-of-the-beloved-sister-will-be-deposited-on-this-date
आमदार कोकाटेनां शह देण्यासाठी मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत…
👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :
✅ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता; पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार
✅ आता प्रकल्पबाधितांना सदनिका मिळणार. धोरणास मान्यता
✅ लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार; कर्ज उभारण्यास मान्यता
✅ आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ.
✅ अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार. अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय
✅ विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार रुपये दंड
✅ महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार. पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार
✅ कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय ; आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय
✅ न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घर कामगार, वाहनचालक सेवा
✅ सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात १०० टक्के सूट
✅ जुन्नरच्या श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय्य
✅ ९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणार.अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार. विविध कार्यक्रमांचे आयोजन ✅ अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस मंजुरी
लाडकी बहिणाचा पहिला हप्ता 27 आॅगस्टला खात्यावर जमा कऱण्यात य़ेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.