येवला तालुक्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
येवला तालुक्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
- वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला दिनांक 6ऑगस्ट 2024/येवला तालुक्यात गेल्या काही दिवसापासून चोरट्यांनी व दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला असून सोमवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास येवला तालुक्यातील कोळगाव येथे दरोड्याखरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असून प्रतिकार करणाऱ्या शेतकऱ्याला गंभीर जखमी केले आहे कोळगाव येथे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी गाडेकर वस्ती येथे दरोडा टाकला जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी प्रतिकार करणाऱ्या शेतकरी कारभारी गाडेकर वय 75 त्यांना दरडोखोरांनी जबर मारहाण केली असून गंभीर इजा झाल्या असून ते येवल्यात खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे येवला तालुका पोलिसांना समजतात त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली तालुक्यात नाकाबंदी केली असून श्वान पथकाला पाचरण करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे पुढील तपास पोलीस करत आहे
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये