भुसावळ विभागाने जुलै महिन्यात मिळवला इतक्या कोटी रुपयांचा महसूल
वेगवान नाशिक/Wegwan Nashik 6 ऑगस्ट,विशेष प्रतिनिधी – भुसावळ विभागाने जुलै २०२४ मध्ये महसुलाचे विविध क्षेत्रात लक्षणीय वाढ साधून असाधारणपणे चांगली कामगिरी केली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री अजय कुमार यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, विभागाला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसा मिळाली आहे.
प्रवासी महसुलाच्या बाबतीत, भुसावळ विभागाला जुलै महिन्यात मध्ये ७८.६७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. या यशात तिकीट तपासणीने महत्त्वपूर्ण योगदान दिले असून एकूण ९ हजार केसेस द्वारे ५५ लाख रुपयांच्या महसुल प्राप्त झाला आहे.
विविध कोचिंग मधून मिळणाऱ्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली असून, ती रु. ०३.०० कोटींवर पोहोचली आहे. विविध सेवा देण्याच्या विभागाच्या वचनबद्धतेमुळे माल वाहतुकीद्वारे ४६.४३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मालगाड्यांनी मोटारगाड्या, पेट्रोलियम उत्पादने, कांदे, अन्नधान्य आणि सिमेंट वॅगनसह विविध प्रकारच्या मालाची कुशलतेने वाहतूक केली आहे.
पार्सल सेवेने एकूण ०४ कोटी रुपयांचा महसूल मिळवला, जे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यात भुसावळ मंडळाची बहुमुखी प्रतिभा दर्शवते. या व्यतिरिक्त, इतर विविध व्यावसायिक क्रियाकलापांमधून विविध महसूल रु. ३.५० कोटी आहे ज्यामुळे विभागाच्या आर्थिक यशात आणखी भर पडली. एकंदरीत, भुसावळ विभागाने जून २०२४ मध्ये १३६ कोटी रुपयांचा उल्लेखनीय महसुल मिळवला आहे.
ही कामगिरी संपूर्ण टीमचे समर्पण आणि परिश्रम दर्शवते, यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री अजय कुमार यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय सहभाग यामुळे विभागाची प्रशंसनीय कामगिरी झाली, ज्याने एक मानक स्थापित केला. या जुलै महिन्यात प्रवाशी सुविधेसाठी भुसावळ आणि शेगाव स्थानकांवर बॅटरी कार सुविधा सुरु करण्यात आली. या सुविधांमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तीं , महिला आणि आजारी व्यक्तींसाठी खूप मदत होईल. दादर-नंदुरबार विशेष गाडीचा भुसावळ पर्यंत विस्तार करण्यात आला.
प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी, भुसावळ विभाग प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊनच प्रवास करावा असे आवाहन करीत आहे. तसेच प्रवाशांनी जास्तीत जास्त प्रमाणात यूटीएस ॲप चा वापर करावा.