आमदार कोकाटेनां शह देण्यासाठी मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत…
.. शिवसेना शिंदे गट सुद्धा वेगळा उमेदवार देणार !
वेगवान नाशिक / भाऊसाहेब र, हांडोरे
सिन्नर : दि. ६ ऑगस्ट २०२४ आगामी सिन्नर विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे काल झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तालुक्यातील माजी आमदार राजाभाऊ वाजे हे नाशिक लोकसभा निवडणुकीत भरघोस मताधिक्य मिळवून विजयी झाल्वियानंतर आता सध्याचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मार्ग मोकळा झाला आहे अशी अपेक्षा असतांनाच आता मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे तालुक्यातील नवीन चर्चेला उधाण आले आहे..
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह सिन्नर येथे बैठक घेण्यात आली याप्रसंगी पक्षाचे निरीक्षक मनसे नेते राजु उंबरकर राज्य उपाध्यक्ष अशोकजी तावरे, नाशिक जिल्हाअध्यक्ष अंकुशभाऊ पवार उपस्थित होते*
“” सिन्नर विधानसभेत मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत “”
*** विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी ला शह देण्यासाठी विरोध कामाला लागले .. असुन शिवसेना शिंदे गट सिन्नर तालुका अध्यक्ष शरद शिंदे हे सुद्धा
वेगळा उमेदवार देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतांच आता मनसे सुध्दा विधानसभेत आपला उमेदवार देण्यासाठी पुढे सरसावली आहे ***
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर विधानसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार उभा करणार असुन संपूर्ण ताकतीने निवडणुक लढणार निवडूण आणणार आगामी काळ हा मनसेचा असुन सन्मा राजसाहेब ठाकरेंचा लवकरच सिन्नर तालुका झंझावाती दौरा होणार आहे*
याबैठकी प्रसंगी नाशिक उपजिल्हाध्यक्ष अमोलभाऊ जाधव, जिल्हासंघटक बाळासाहेब गोळेसर, तालुका अध्यक्ष रामदास खैरनार, शहरअध्यक्ष गणेश मुत्रक, तालुका सचिव शरद घुगे, तालुका संघटक संतोष सानप, शहर उपाध्यक्ष भिवाजी शिंदे, मनविसे तालुका अध्यक्ष योगेश बिन्नर, शहर संघटक एकनाथ दिघे, एकनाथ दळवी, लखन खर्डे, कैलास सहाणे, संतोष गांजवे, सागर वाघचौरे, राहुल पोमनर, सुरज आव्हाड, रोहन वारूगसें, दर्शन तुपे, ज्ञानेश्वर पाचोरे, अनिकेत तुपे, सतिश आरोटे सागर मुरडनर, समीर पठाण गोरख जाधव, विक्की जाधव, आदी सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
शिवसेना शिंदे गट सिन्नर तालुका अध्यक्ष शरद शिंदे यांचं सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत… त्यात त्यांनी सांगितले की
महाराष्ट्रात डरकाळ्या फोडणारे ,दंड थोपटणारे सर्वच पक्ष व पक्षांचे राज्य नेते, जिल्हा नेते सिन्नर तालुक्यात खा.वाजे व आ.कोकाटे यांच्या समोर उमेदवार देण्यास हतबल का?दिला एखांद वेळी तर प्रचारास माघार का?का घाबरता यांना?
किती दिवस सिन्नर तालुक्यातील जनतेन खा.वाजे ,आ.कोकाटे यांची घराणेशाही,मक्तेदारी सहन करायची?मग आम्हा तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते यांना कर्जबाजारी करत पक्ष उभा करायला,आंदोलन करायला का वापरून घेता?असा काय व्यव्हार आहेत तुमचा खा.वाजे व आ.कोकाटे यांच्या बरोबर?
सिन्नर तालुक्यातील जनतेचा व शरद शिंदेपाटील यांचा रोखठोक सवाल.
-शरद शिंदे पाटील यांच्या या सवाल उत्तर देताना सिन्नर तालुक्यातील पुर्व भागातील आमदार माणिकराव कोकाटे यांचे सहकारी धनगर समाजाचे नेते श्री बाळासाहेब कांदळकर यांनी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देताना म्हटले आहे की *चुकीच्या निर्णयाविरोधात जाहीर बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते, त्यांच्यात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते. एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते, ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते.*_*
चुकीच्या निर्णयाविरोधात जाहीर बंड करण्याची धमक त्यांच्यात असते.त्यांच्यात स्वत:च अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते. एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते . ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते..
पै .बाबासाहेब कांदळकर …..