नाशिक ग्रामीण

सबसिडीत ट्रॕक्टर घेऊन देण्याचे अमिष दाखवुन 91 हजार 500 रुपयांची फसवणुक संदिप अवधुत विरोधात आता वणी पोलिस ठाण्यात तक्रार


वेगवान नाशिक/सागर मोर

वणी – कळवण व सुरगाणा या तालुक्यातील आदिवासी शेतकर्यांचे आर्थिक शोषणाच्या तक्रारीचा तपास सुरु असताना आता दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथील आदिवासी शेतकर्याला सबसिडीचे अमिष दाखवुन आदिवासी भवन येथुन ट्रॕक्टर मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन शेतकर्याला 91 हजार 500 रुपयांचा गंडा कथित पत्रकार संदिप भिकाजी अवधुत याने घातल्याची तक्रार शेतकर्याने वणी पोलिसात केल्याने खळबळ उडाली असुन आत्तापावेतो अभोणा येथे तीन सुरगाणा येथे एक व वणी येथे अशा एकुण पाच तक्रारी अवधुत विरोधात दाखल झाल्या असुन पैकी अभोणा पोलिसात एका तक्रारीनुसार ठकबाजीचा गुन्हा यापुर्वीच दाखल करण्यात आलेला आहे.याबाबत तक्रारीचे स्वरूप असे संदिप अवधुत याने परीचीताच्या माध्यमातुन शेगाव येथे पत्र्याची टपरी न्यावयाची असल्याने पिकअप चालक व शेतकरी गणेश उर्फ बाळु यशवंत गवळी रा,कोल्हेर , ता,दिंडोरी यांचेबरोबर संपर्क साधला व याचे,वाहतुक भाडे 18 हजार रुपये ठरविण्यात आले.शेगाव येथुन परत आल्यानंतर वेळोवेळी संदिप अवधुत याचेकडे गणेश गवळी यांनी यारकमेची मागणी केली मात्र तुझा फायदा करुन देतो सबसिडीमधे ट्रॕक्टर कमी पैशात मिळवुन देतो आदिवासी विकास भवन मधील अधिकारी यांचेबरोबर ओळख असल्याचे भासविले.ट्रॕक्टरचे फाॕर्म सुटले आहेत.मला मात्र कमीशन द्यावे लागेल तुमचे काम करुन देईल ,असे अमिष दाखविले,मे2024 च्या दुसर्या आठवड्यात उधार उसनवार करुन 50 हजार रुपयाःची तजवीज गवळी यांनी केली वणी बसस्थानकात अवधुत याला रोख स्वरुपात पन्नास हजार रुपये दिले.तदनंतर काही दिवसांनी पुन्हा अवधुत याने संपर्क साधुन पैशाची मागणी केली मात्र त्यावेळी गवळीनी सांगितले की फाॕर्म भरले नाही ,सह्या घेतल्या नाही ,ओटीपी आला नाही ट्रॕक्टर केव्हा मिळणार अशी विचारणा केली असता प्रोसेसमधे असल्याचे त्याने सांगितले .अवधुत याने त्याचे मोबाईलवर 10 हजार रुपये फोन पे करण्यासाठी सांगितले त्यावर विश्वास ठेवुन 17 जुन 2024 रोजी गवळी यांनी 10 हजार रुपये अवधुतच्या नंबरवर फोन पे केले,त्यानंतर 18 जुन 2024 रोजी अवधुत याने सांगितलेल्या मोबाईलवर 3500 रुपये फोन पे केले त्यानंतर ट्रॕक्टरचे काम अंतिम टप्यात आहे.ते होऊन जाईल असे आश्वासन देऊन अवधुतने दिलेल्या नंबरवर 10 हजार रुपये फोन पे करण्यासाठी सांगितले गवळी यांनी त्या क्रमांकावर 3 जुलै 2024 रोजी सदर रक्कम फोन पे केली,त्यानंतर वेळोवेळी ट्रॕक्टर बाबत चौकशी गवळी यांनी केली असता आश्वासन दिले.त्या दरम्यान संदिप भिकाजी अवधुत याचेवर अभोणा पोलिस ठाण्यात आदिवासी शेतकर्याची दिड लाख रूपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल असाल्याची बातमी पेपरमधे वाचल्यानंतर संदिप अवधुत याने नियोजनबद्ध विश्वास घात करुन फसवणुक केल्याने त्याचेवर कडक कारवाई करावी अशी लेखी तक्रार गणेश गवळी यांनी वणी पोलिसात केली आहे.दरम्यान कळवण ,सुरगाणा व आता दिंडोरी तालुक्यात एका पाठोपाठ तक्रारी संदिप अवधुत याचे विरोधात विविध पोलिस ठाण्यात आल्याने पोलिस यंत्रणा चक्रावली असुन आदिवासी शेतकर्यांना लाखो रुपयांना गंडा घालण्याचा आरोप असलेल्या संदिप अवधुत याला आता पोलिसी खाक्या दाखविण्याची वेळ आली असुन फसवणुकीचे मोठे रॕकेट असण्याची शक्यता असुन याबाबत कडक कारवाईची मागणी पिडीताकडुन होत आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!