नाशिकः 20 जणांची रात्र भयंकर पुरामध्ये, अखेर हेलिकॉप्टर आलं…
वेगवान नाशिक
नाशिक , ता. 5 आॅगस्ट 2024 – : मालेगाव तालुक्यातील गिरणा नदीत मासेमारी करताना 15 जण अडकल्याने रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास खळबळ उडाला. त्यांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. अखेर लष्कराच्या हेलिकॉप्टरने सुटका केल्याने अडकलेल्या सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
छगन भुजबळ यांना येवल्यातून निवडून येणं यावेळेस कठीण
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे जवळपास सर्वच नद्या, नाल्यांना पूर आला आहे. सुरू असलेल्या या पावसामुळे काही प्रमाणात पावसाने उघडीप दिली आहे.
सबसिडीत ट्रॕक्टर घेऊन देण्याचे अमिष दाखवुन 91 हजार 500 रुपयांची फसवणुक
मात्र, रविवारी 4 तारखेला काही जण म्हारे जवळील गिरणा नदीत मासेमारीसाठी गेले होते. गिरणा आणि मोसम नद्यांना अचानक आलेल्या पुरामुळे पाण्याची पातळी वाढली आणि हे 15 जण 20 तासांहून अधिक काळ नदीत अडकले होते. सोमवार 5 तारखेच्या सकाळपासून महापालिका प्रशासन, अग्निशमन दल आणि एसडीआरएफचे जवान या अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, नदीपात्रात जोरदार प्रवाह असल्याने लोकांना बाहेर काढणे त्यांना शक्य झाले नाही.
गोपाळसागर (केळझर) धरण पूर्ण क्षमतेने भरून विसर्ग सुरू
अखेर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने प्रशासनाने 20 तासांनंतर अडकलेल्या 15 जणांची सुखरूप सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल.