नाशिक ग्रामीण

छगन भुजबळ यांना येवल्यातून निवडून येणं यावेळेस कठीण

छगन भुजबळ यांना येवल्यातून निवडून येणं यावेळेस कठीण


वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव

येवला  : 5 ऑगस्ट 2024  लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांना कांद्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक सोपी करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत प्रयत्न सुरू आहेत. येवला मतदारसंघ तगडे नेते मंत्री छगन भुजबळ यांचा असल्याने याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. महायुतीकडून स्वतः श्री.भुजबळ बलाढ्य असले, तरी यावेळी त्यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेसशी (शरद पवार गट) होणार असल्याचे चित्र आहे. या लढ्यात विकासाचे आणि सर्वसमावेशकतेचे राजकारण टिकणार की मराठा ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला फटका बसणार, अशी चर्चा सुरू आहे.

मंत्री छगन भुजबळ येवल्यातील बहुतांश विकासाचे प्रश्न सोडवण्यात भुजबळांना यश आले असले तरी या निवडणुकीत त्यांना विशेषतः मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेनेलाही शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी हातमिळवणी करावी लागणार आहे. स्वकीयांसह भुजबळांनी अलिकडेच विरोधकांची कोंडी करण्यासाठी बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघात चार पंचवार्षिक पासून प्रतिनिधित्व करतात. येवल्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले, पिण्याच्या पाण्याचा तसेच रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यात ते अग्रेसर होते. शेती सिंचनासाठी पाणी देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

येवला विधानसभा निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवारांची गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. उमेदवारांची सोशल मीडिया टीम स्वत:ला भावी आमदार म्हणून प्रमोट करण्यासाठी काम करत आहे. प्रभावशाली मुद्दे तपासण्यात आणि लोकांमध्ये जाण्यात ते एक क्षणही चुकत नाहीत, असे चित्र आहे. विद्यमान आमदार, राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हेही मागे नाहीत, मंत्री भुजबळ यांनी नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार मारोतराव पवार यांना पाठिंबा देऊन आणि त्यांच्या सून सविता बाळासाहेब पवार यांना सभापतीपदासाठी पाठिंबा देऊन भुजबळांनी राजकारण केले. माजी आमदार मारोतीराव पवार यांचे पुतणे व माजी पंचायत समिती सभापती संभाजी पवार यांना आपल्या मर्जीत ठेवण्यासाठी मंत्री भुजबळ नेहमी आग्रही राहिले असून पवारांशी सलोखा वृद्धिंगत ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात . भुजबळ सातत्याने अविचल असून पवारांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून मसल पॉवरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्थानिक विरोधकांची मते वळविण्याच्या मतदारसंघातील उमेदवारांच्या हालचाली गतिमान झाल्यामुळे प्रथमच या चर्चेला उधाण आले आहे.

मराठा आरक्षण ढाल.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान माजी पंचायत समिती सभापती संभाजी पवार यांचे गटसंचालक सचिन आहेर यांनी भुजबळांच्या पाठिंब्याचा निषेध करत निवडणुकीला अलिप्त राहून श्री. आहेर हे मराठा आंदोलनात सक्रिय असून मराठा आंदोलक जरंगे पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. भावी उमेदवार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे. नुकतीच जाहीर सभा घेऊन त्यांना त्यांच्या मित्रांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी भुजबळ विरोधी भूमिकेला मिळालेली नांदी आगामी काळात य कुतुहलाचा विषय बनला तरच नवल नाही

मला पवार नावाची भीती वाटते

मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडी आणि महायुतीमधील येवल्यातील राजकारण पवारांच्या नावाभोवती फिरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा येवला विधानसभा मतदारसंघ बरोबर असून, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे संस्थापक शरदचंद्र पवार या दोन गटांमध्ये थेट लढत होईल, अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादीचे मंत्री भुजबळ हे महाआघाडीचे उमेदवार असले तरी अनेक दिग्गज नेते महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये श्री. शरदचंद्र पवार हे वैयक्तिक पातळीवर स्थानिक नेत्यांच्या जवळचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या जाहीर सभेत माजी आमदार मारोतराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी सभापती संभाजी पवार यांच्या उपस्थितीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे आगामी काळातील राजकारण शरद पवारांच्या निर्णयांभोवतीच फिरणार आहे. पवारांवर विश्वास ठेवणारा मोठा गट आणि उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या बोलण्यात इतरांना रोखण्याची ताकद आहे हे येवलेकरांना माहीत आहे.

शिंदे यांचा गनिमीकावा

2004 मध्ये मंत्री भुजबळांनी येवल्यातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरणारे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे आज त्यांच्या विरोधात आहेत. एकूणच त्यांनी येवला मतदारसंघ सोडावा ही भूमिका घेणारे देखील शिंदेच आहे . नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार शिंदेंनी एकट्याने प्रचाराची धुरा सांभाळत मतांची मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे तेही उमेदवारीसाठी प्रयत्नशील असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे उमेदवार निवडून आणण्यात त्यांचा गनिमी कावा महत्त्वाचा ठरणार आहे.

दराडेंची भूमिका

एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत मोठी डोकेदुखी बनला आहे, तर दुसरीकडे माधव (माळी, धनगर, वंजारी) समाजाला एकत्र ठेवण्यासाठी भुजबळ गटाला कसरत करावी लागणार आहे. मात्र, शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटातील तरुण नेते कुणाल दराडे गेल्या काही वर्षांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. आमदार नरेंद्र दराडे आणि आमदार किशोर दराडे यांचे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे कौशल्य सर्वश्रुत आहे आणि ते इथेच थांबणार नाही. त्यामुळे कोण निवडणूक लढवणार याच्या आधारे या भागातील आगामी राजकारण बदलणार आहे.

विकासाची जादू चालेल का?

येवला विधानसभा मतदारसंघात येवला आणि विंचूर येथे मंत्री भुजबळ यांची संपर्क कार्यालये आहेत. मात्र, काही तक्रारींमुळे भुजबळांनी येवला मतदारसंघाचा कारभार त्यांचे निकटवर्तीय समता परिषदेचे नेते दिलीप खैरे यांच्याकडे सोपवला आहे. खैरेनी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि तालुक्यातील जिव्हाळ्याचा मांजरपाडा प्रकल्पाचे काम वेगाने मार्गी लावण्यासाठी खैरे यांनी जीवाचे रान केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत या पावसाळ्यात मांजरपाड्यातून पाणी आणण्याचे आश्वासन पूर्ण करण्यावर भुजबळांचा भर आहे.


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!