वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला दिनांक /4आगस्ट 2024/पावसा अभावी येवला तालुक्यातील शेेतकरी चिंताग्रस्त
येवला तालुक्यातील सायगाव,नगरसुल,राजापूर पांझरवाडी,अंगुलगाव,गारखेडा,गवदंगाव,न्यारखेडा, रेंडाले,कोळगाव, वाइबोठी,धामणगाव,अंदरसुल,नागडे, ममदापुर,भारम,डोंगरगाव,भुलेगाव,सुरेगावं, आदी गावामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
येवला तालुक्यात दोन महिने पावसाचे समाप्त होत आले तरी चांगला पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील नद्या बंधारे विहरी शेततळे कोरडेठाक आहे
यावर्षी हवामान खात्याने समाधानकारक पाऊस होणार असल्याचे संकेत दिले होते पावसाचे राज्यात वेळेवर आगमन झाले मात्र पावसाचे वितरण विषम स्वरूपाचे झाले राज्यात काही ठिकाणी खूप तर काही ठिकाणी खूप पडला मात्र याच्या सम्पूर्ण विरोधी परिस्थती येवला तालुक्याची आहे
तालुक्यातील अनेक नद्या , बंधारे , विहरी, शेततळे,कोरडेठाक असून शेतातून अद्याप पाणी वाहिले नसल्याने विहरी कोरड्या आहे
तालुक्यातील शेतकरी नद्या बंधारे विहरी शेततळे कधी भरतील म्हणून पावसाची वाट पाहत आहे राज्यातील अनेक भागात बंधारे नदी नाले दुथडी भरून वाहत असले तरी येवला तालुक्यातील शेतकरी आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहे वरुणराजाच्या कृपादृष्टीची वाट पाहत आहे
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये