ओझरखेड धरणात१२.७७ टक्के तर पुणेगांव धरणात ८० टक्के जलसाठा.पुणेगांव धरणातून ३००क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू
वेगवान नाशिक/सागर मोर
वणी: ओझरखेड व पुणेगांव धरण क्षेत्रात दोन तीन दिवसा पासुन पडत असलेल्यां पावसामुळे नदी नाल्यांना पुर आल्याने पाण्याची आवक वाढुन धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.ओझरखेड धरण क्षेत्रात पडल असलेल्या पावसाने सायं पाच वाजेपर्यंत १२.७७ टक्के जलसाठा झाला आहे.दि.२ऑगष्ट पर्यंत उपयुक्त साठा शुन्य होता.दि.४ ऑगष्ट रोजी सांयकाळी पाच वाजेपर्यंत ८ टक्के झाल्याची माहिती शाखा अभियंता भुषण कुवर ( जल संपदा विभाग ओझरखेड प्रकल्प) यांनी दिली. तसेच पुणेगांव धरणात जलसाठा वाढला असून तेथील विसर्ग ३००क्युसेसनी सुरू करण्यात आला आहे. ओझरखेड धरणातील जलसाठ्यात वाढ होईल पुर्ण क्षमतेने भरण्यास मदत होईल.पुणेगांव धरण क्षेत्राच्या परिसरात पाऊस पडत असल्याने ८० टक्के जलसाठा वाढला आहे .सुरू असलेल्या पावसामुळे भरले आहे. तसेच मांजरपाडा प्रकल्पातून २५ द.ल.घ.फु पाणी येत असुन झपाट्याने जलसाठ्यात वाढ होत आहे. पाण्याचा विसर्ग सुरू केला असुन जवळपासच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे .अशी माहिती शाखा अभियंता विक्रम डावरे (जल संपदा विभाग पुणेगांव प्रकल्प)यांनी दिली.पुणेगांव धरणातील ३००क्युसेस पाण्याचा विसर्ग व ओझरखेड धरण परिसरात सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण असे असल्यास ओझरखेड धरणातील जलसाठा वाढत राहील व येत्या आठवडय़ात पुर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तविण्यात आली .वणी व परीसरात समाधानकारक पाऊस सुरू आहे.देवनदी लेंडीनाला तसेच परिसरातील ओहोळ ओसंडून वाहत आहेत.सायंकाळपर्यंत पाऊस संततधार सुरूच आहे.