नाशिक जिल्ह्याला पुढील तीन तास महत्वाचे, मुसळधार पावसाचा इशारा
नाशिक जिल्ह्याला पुढील तीन तास मुसळधार पावसाचा इशारा
वेगवान नाशिक
नाशिक, ता. 4 ऑगस्ट 2024
नाशिक जिल्ह्यात काल पासून संततधार पाऊस आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणात खंड दिला होता मात्र कालपासून जिल्ह्याच्या आणि शहरांमध्ये संतदार पाऊस सुरू असल्यामुळे नद्या खळखळून वाहू लागलेले आहेत सुरगाणा तालुक्यामधील अनेक नद्यांना पूर आलेला आहे. नाशिक जिल्ह्याला येत्या तीन तासांमध्ये मुसळधार असा पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्यामार्फत देण्यात आलेला आहे .तश्या सूचना विविध माध्यमातून देण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यात नद्यांना पूर पहा (व्हिडीओ )
जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे इगतपुरी तालुक्यात दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. नांदूर मधमेश्वर आणि कडबा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये काल रात्री चांगला पाऊस झाला त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. नाशिकला ज्या गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होतो ते 70 टक्के पर्यंत पोहोचला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी बायकोवर लक्ष ठेवा
नाशिक जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून आकाशातून पश्चिमेकडून पूर्वेकडे ढग वाहत आहे, वारे शांत असून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. हवामान खात्याकडून एक अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
नाशिक जिल्ह्यात 3 पासून पर्यंत सात जुलै पर्यंत मुसळधार त्या अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वाऱ्याचा वेग 17 ते 28 प्रति असणार आहे. चार ऑगस्टला ऑरेंज अलर्ट नाशिक जिल्ह्यासह इतरत्र राज्यातील काही भागाला देण्यात आलेला.