नाशिक ग्रामीण

गोपाळसागर (केळझर) धरण पूर्ण क्षमतेने भरून विसर्ग सुरू

सटाणा शहरासह नदीकाठच्या गावांना दिलासा


वेगवान नाशिक/अतुल सुर्यवंशी
४/८/२०२४
डांगसौदाने : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात ५७२ दलघफु क्षमता असलेले गोपाळसागर ( केळझर) हे धरण पूर्ण क्षमतेने भरून विसर्ग सुरू झाला.
धरण क्षेत्रात गेली दोन दिवस सुरू असलेल्या संततधार मुळे आज सायंकाळी उशिरा धरणाच्या सांडव्यावरून आरम नदी पत्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे आरम खोऱ्यातील २५ ते ३० गावांसह सटाणा शहराला पाणी टंचाई पासून दिलासा देणारे हे धरण भरल्याने शेतकरी, व परिसरसतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. गत वर्षी ७ ऑगष्ट ला भरलेलं हे धरण याही वर्षी ऑगस्ट च्या सुरवातीला दोन दिवस सुरू असलेल्या संततधारेमुळे धरण भरले आहे धरण भरल्याने आगामी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या असुन आगामी काळात जर पावसाची अशीच बरसात सुरू राहिली तर आरम नदी ला पुर येण्याची शक्यता असुन नदीकाठवरील गावांना ही प्रशासनातर्फे सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत धरणातुन आज रोजी ७५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे हा विसर्ग वाढण्याची शक्यता जलसंपदा विभागाचे अधिकारी सी.पी खैरनार यांनी व्यक्त केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!