नाशिक ग्रामीण
सिद्धार्थ हौसिंग सोसायटीत आगीची घटना
वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव,दि.4 ऑगस्ट-
शहरातील सिद्धार्थ हौसिंग सोसायटीतील रहिवासी पंकज चाबुकस्वार यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली आहे.
आग लागल्याची माहिती कळताच मनमाड अग्निशमन दलाने तात्काळ दाखल घेऊन जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
यावेळी अग्निशमन प्रमुख जयदेव मगर,वाहन चालक प्रदीप करोसिया,फायरमन मनोज पवार व दीपक झाल्टे यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीमध्ये घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचे समजते.कुठलीही जिवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…