ठेकेदाराकडून ज्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे त्या ठिकाणचे रस्ते त्वरित बनविण्यात यावे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवेदनाद्वारे मागणी
वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,अविनाश पारखे,मनमाड,नांदगाव,दि.1 ऑगस्ट-
मनमाड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळपास सुटण्याच्या मार्गात आहे.लवकरच करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे.शहरातील अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे.मात्र या जलवाहिन्या टाकताना शहरातील विविध भागातील अंतर्गत रस्ते खोदावे लागले आहेत.परिणामी अंतर्गत रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल दिसून येत आहे.या चिखलातून चालताना पादचारी आणि वाहनचालकांना त्रास होत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवीत असताना मात्र या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
ज्या भागात पाईपलाईनचे काम झाले आहे तेथील रस्ते बनविण्यात यावेत याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मनमाड नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
तत्कालीन नगराध्यक्षा सौ.पद्मावती जगन्नाथ धात्रक यांनी करंजवण योजनेअंतर्गत पाईपलाईनसाठी नऊ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला होता. करंजवण योजनेअंतर्गत मनमाड शहरात अंतर्गत पाईपलाईन योजनेत मनमाड शहरातील रस्ते फोडून सदरची पाईपलाईन टाकण्यात आली आणि ते करणेही आवश्यक होते परंतु सदरचे रस्ते त्वरित बनविण्यात यावे त्यासाठीची तरतूद इस्टिमेट मध्ये करण्यात आलेली आहे.
त्यामुळे सदरच्या ठेकेदाराकडून ज्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे त्या ठिकाणचे रस्ते त्वरित बनविण्यात यावे जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही.
ज्या ठिकाणी काँक्रीट रस्ता किंवा डांबरी रस्ता, डब्ल्यू बी एम रस्ता असेल त्याप्रमाणे इस्टिमेट नुसार सदरील रस्ते बनविण्यात येतील असा खुलासा वर्तमानपत्राद्वारे करावा व आम्हास लिखित स्वरूपात आम्हाला मिळावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक व पदाधिकाऱ्यांद्वारे देण्यात आले.
यावेळी सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक,जिल्हाप्रमुख गणेश धात्रक,उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद,जिल्हा समन्वयक सुनील पाटील,जिल्हा संघटक संजय कटारिया,शहर प्रमुख माधव शेलार,संतोष जगताप, लियाकत शेख,विनय आहेर,विजय मिश्रा,प्रमोद पाचोरकर,सनी फासाटे,राजाभाऊ वाघ,पप्पू सूर्यवंशी,रवींद्र अमराळे,इरफान शेख,मनोज अंकुश, अनिल दराडे,विवेक परदेशी,दत्तू काकुळते,राहुल सांगळे,परेश राऊत,अतुल साबळे,अनिल सापनर, सुनील जाधव,चेतन सांगळे,वसंत नागरे,रवींद्र इप्पर, सुनील गवळी,पिंटू साळुंखे,रवी खोटरे,योगेश परदेशी, राकेश आहेरराव,रामा हजारे,प्रवीण धाकराव,पंडित सानप,प्रकाश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…