नाशिक ग्रामीणशेती

शहा येथील शेतातील मुरूम, दगड,माती गायब.. ” जमीन नापीक ” !

प्रहार जनशक्ती चा दणका -- तहसीलदारांनी दिले चौकशीचे आदेश !


वेगवान नाशिक / भाऊसाहेब र, हांडोरे

सिन्नर : दि. १ ऑगस्ट २०२४ —  तालुक्यातील पुर्व भागात सध्या पुरचारी चे काम सुरू असून खोदकाम करत असताना त्या जमिनीतुन निघणारा दगड माती आणि मुरुम हा त्या शेतकर्यांचा अधिकार असताना सुद्धा हे काम करणाऱ्या कंपनीने हे सर्व मटेरीयल रस्ता दुरुस्ती साठी वापरला असल्याचे दिसून येत आहे. तसेच दुसऱ्या एका ठेकेदाराने रस्त्याच्या कामासाठी याच जमिनीतुन मोठ- मोठ्या अवजड वाहने ने – आण केल्यामुळेच शेताची नुकसान झाले असून या जागेवर पिक येत नसल्याने जमीन नापीक होत असल्याचे भीती तक्रारदार श्री जिजाबा शिंदे यांनी केली होती.

यासंदर्भात श्री शिंदे यांनी संबंधित कंपनीला वारंवार सांगितले परंतु या ठेकेदार व इतर कर्मचारी यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन गप्प बसवले.परंतु प्रहार जनशक्ती संघटनेचे नाशिक जिल्हा चिटणीस उमाकांत बागल यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन सिन्नर तहसीलदार यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते.

या निवेदनात म्हटले की शहा गावात पुरपाणी नलीकेचे काम चालू असुन त्या ठिकाणी गट नंबर ६३५ मधील शेतकरी जिजाबा गजिराम शिंदे यांना कुठल्याही पुर्व कल्पना न देता शेतामध्ये काम सुरू करण्यात आले व संबंधित ठेकेदारा कंपनीने काम करतांना शेतातुन निघणारा मुरूम,माती ,दगड यांची चोरी करत आजुबाजुला रस्ता बनवला.व काही मुरुम माती विकली व परस्पर विल्हेवाट लावली. सदरील क्षेत्रात उन्हाळ्यात श्री शिंदे यांनी लागवड पुर्व मशागत करून ठेवलेलं क्षेत्र अवजड व छोटे मोठे वहाने ने – आण करून व जेसीबी मशीनच्या साह्याने पुर्ण शेतातुन रस्ता बनवला त्याचा वापर पुरचारी व मिरगाव – पंचाळे या रस्त्याच्या कामासाठी करतं आहे त्यामुळे सदर जमीन नापीक करत आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

श्री जिजाबा गजिराम शिंदे या शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हे क्षेत्र नापीक करणार्या संबंधित खनिज संपत्तीची चोरी करणाऱ्या कंपनी ठेकेदारावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली. सदर कंपनीने वर त्वरित पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात यावा व संबंधित शेतकरी श्री शिंदे यांना नुकसानभरपाई द्यावी.

अमरण उपोषण  व  भिक मांगो आंदोलन करण्याचा दिला होता इशारा — प्रहार जनशक्ती

” सिन्नर शहरात शेतकरी ” भिक मांगो  ” आंदोलन  करण्याचा इशारा .. श्री उमाकांत बागल ,  (जिल्हा चिटणीस प्रहार जनशक्ती संघटना  )

” धनदांडग्या कंपनीने ठेकेदाराने सर्व सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचे उघडकीस ….

सिन्नर तहसीलदार यांनी दिले चौकशीचे आदेश ….

”  मंडळ अधिकारी शहा यांनी पंचनामा करून तहसीलदार कार्यालयस अहवाल सादर …

  • येथील पुरचारी चे काम सुरू आहे ग.न.६३५ मध्ये पुरचारी चे काम करीत असताना जिजाबा गजिराम शिंदे यांच्या क्षेत्रातुन पुरचारी गेली असुन ग.न.६३५ मध्ये चारीचे खोदकाम करताना गौण खनिज मुरूम माती व दगड निघाले आहे ते सदर ग.न.मध्ये ढीग.व डेपो दिसून येतात तसेच अर्जदार यांच्या गटालगत असलेला जूना मिरगाव पंचाळे रोडचे हि नव्याने काम चालू आहे . चोरीच्या कामाचा दगड माती व मुरूम सदर रस्त्यासाठी वापरल्याचे दिसून येते.तसेच चारीचे काम करणाऱ्या यंत्रणेने गाडी व वाहने ग.न.६३५ वापरले झाल्याने ग.न.६३५ मधील त्यांच्या खुणा दिसुन येतात.याबाबत सविस्तर पंचनामा व जबाब लिहून घेतला आहे.तो पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे. असे तहसीलदार यांनी श्री शिंदे यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे. संबंधित शेतकर्याला न्याय मिळण्याची अपेक्षा प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!