वेगवान नाशिक/Wegwan Nashik विशेष प्रतिनिधी १ ऑगस्ट
खालील विशेष गाड्यांना मिळाली मुदत वाढ
प्रवाशांच्या चांगल्या प्रतीसादामुळे आणि मागणीमुळे, तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे द्वारा विशेष गाड्याना मुदत वाढ देण्यात येत आहे .ते विशेष गाडी पुढील प्रमाणे –
१) कोयम्बटूर- भगत की कोठी विशेष
ट्रेन क्र. ०६१८१ कोयम्बटूर- भगत की कोठी साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २६.०९.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०६१८२ भगत की कोठी-कोयम्बटूर साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २९.०९.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
२) साई नगर शिर्डी -बिकानेर विशेष
ट्रेन क्र. ०४७१६ साई नगर शिर्डी -बिकानेर साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ०१.०९.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०४७१५ बिकानेर – साई नगर शिर्डी साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ३१.०८.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
३) लोकमान्य टिळक टर्मिनस -सुभेदारगंज विशेष
ट्रेन क्र. ०४११६ लोकमान्य टिळक टर्मिनस -सुभेदारगंज साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ३०.०८.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०४११५ सुभेदारगंज -लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २९.०८.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
४) पुणे -वीरांगना लक्ष्मीबाई झांसी विशेष
ट्रेन क्र. ०१९२१ पुणे -वीरांगना लक्ष्मीबाई झांसी साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २९.०८.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०१९२२ वीरांगना लक्ष्मीबाई झांसी – पुणे साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २८.०८.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
आरक्षण: ०१९२१ आणि ०४७१६ विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर दिनांक ०२.०८.२०२४ सुरू होईल.
वरील विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.