देवळा तालुक्यात दोघं जण सोबत दारु पिले..नंतर जे घडलं…ते पाहुन… व्हिडीओ पहा
Two people drank alcohol together in Devla taluka.. What happened after that...

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा,ता. 31 जुलै 2024 –
देवळा : तालुक्यातील मटाने येथील दोघा व्यक्तींनी एकत्र दारू पिल्यानंतर झालेल्या काही किरकोळ कारणावरून वाद झाला, यानंतर एकाने दुसऱ्याच्या छातीत धारदार शस्र खोपसून खून केल्याची धक्कादायक घटना मटाने येथील कळवण रस्त्यावर घडली आहे. या घटनेमुळे देवळा पोलीस ठाणे परिसर व देवळा ग्रामीण रुग्णालयात येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.
या तारखेला नाशिक सह महाराष्ट्रात पाऊस दाणादाण करणार nashik rain update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दीपक निंबा साबळे (वय ४५) रा. मटाने असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी संतोष बाळासाहेब पवार (वय ३८) रा. मटाने याला देवळा पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
देवळा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी ; घरफोडीतील आरोपीला पकडण्यात यश
मटाने येथे कांद्याचा व्यवसाय करणारे दीपक साबळे आणि येथीलच रंगकाम करणारे संतोष पवार उर्फ ज्वाल्या यांनी सोबत सकाळी देवळा येथे दारू पिली यानंतर त्या दोघांमध्ये किरकोळ कारनावरून वाद झाला. यानंतर दुपारी ४ वाजेच्या दरम्यान मटाने येथे कळवण रस्त्यावरील चिकन दुकानाजवळ दोघांचा पुन्हा वाद झाला. आणि या वादामध्ये संतोष पवार याने दीपक साबळे याचा छातीत धारदार शस्र खोपसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
फक्त याच महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर, माहिती समजून घ्या
या बाबत देवळा पोलीसांना माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी संतोष पवार याला तात्काळ अटक केली.
सदर घटनेनंतर देवळा पोलीस ठाणे व देवळा ग्रामिण रुग्णालय परिसरात मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी तसेच नागरिकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती.
