या तारखेला नाशिक सह महाराष्ट्रात पाऊस दाणादाण करणार nashik rain update
nashik rain update या तारखेला नाशिक सह महाराष्ट्रात पाऊस दाणादाण करणार nashik rain update
वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
नाशिक, ता. 31 जुलै 2024 –
nashik rain update नाशिक जिल्ह्यात पावसाने चांगलीच दडी मारली आहे. शेतात पिक तग धरुन आहे मात्र नाशिक जिल्ह्यातील धरणे पूर्ण कोरडी ठाक आहे. नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात कांदा रोप लागवडी साठी तयार आहे मात्र पाऊस नसल्याने शेतकरी थांबून आहे. चांदवड, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर तालुक्यात पाऊस झालेला नाही. रिम झिम पावसावर पिके उभे आहे. मात्र येत्या काही दिवसातं हवामान खात्याकडून समाधान कारक अपडेट आले आहे. पाऊस नाशिक सह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये दाणादाण करणार असून याचा फायदा शेतक-यांना होणार आहे.
पाऊस मुंबई, व कोकणात मुसळधार पडला मात्र नाशिक सह नगर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने थोडा ब्रेक घेतला असला तरी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अजूनही पाऊस सुरू आहे. मात्र, १ ऑगस्टपासून पावसाने पुन्हा जोर धरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि जुलैमध्ये आणखी तीव्र पाऊस पडला, ज्यामुळे जूनमधील कमतरता भरून निघाली. एकूणच, जून आणि जुलैच्या एकत्रित पावसाने सरासरी ओलांडली आहे. मराठवाडा वगळता संपूर्ण राज्यात या महिन्यात समाधानकारक पाऊस झाला असून, राज्यातील जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे.
जुलै महिन्याच्या शेवटी पावसाने काही दिवस विश्रांती घेतली. मात्र, गुरुवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात, किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले, ज्यामुळे मुंबई आणि राज्याच्या इतर भागात जोरदार पाऊस झाला. हा पट्टा जसजसा पातळ होत गेला तसतशी पावसाची तीव्रता कमी झाली. सध्या अरबी समुद्र आणि सौराष्ट्र प्रदेशात चक्री वारे वाहत आहेत, त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत मुंबई आणि राज्याच्या इतर भागात मुसळधार पाऊस पडू शकतो.
हवामान खात्याने पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गुरुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 31 जुलैसाठी कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मुंबई, रत्नागिरी, पुणे, सातारा, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांसाठी पिवळा अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात यलो अलर्ट
विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिक सह इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आपण जर खालील नकाशामध्ये पाहिले तर नाशिक जिल्ह्यात 2 आणि 3 तारखेला पाऊस दाखविण्यात आला आहे. हा हवामान खात्याचा सेटलाईट अंदाज आहे.
30 th Jul: हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. गुरुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
IMD pic.twitter.com/FccJz0BFwF— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 30, 2024