या उद्देशाने ते दोघे देशभक्त करणार ५ हजार किमीचा प्रवास
सेवानिवृत्त नायक दीपचंद व पंडित अभिषेक गौतम करणार ५५९ कारगिल शहिदांच्या माहितीचे संकलन

वेगवान नाशिक/ Wegwan Nashik
विशेष प्रतिनिधी, देवळाली कॅम्प :- भारत भूमीच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या स्मृती जोपासण्याकामी येथील रहिवासी व लष्करातून सेवानिवृत्त झालेले दिव्यांग नायक दीपचंद व अंगावर शहिदांचे नाव कोरणारे पंडित अभिषेक गौतम या देशभक्त जोडगोळीचा नाशिक ते लेह असा ५ हजार किमी पेक्षा जास्त प्रवासाला काल देवळालीतून सुरुवात होऊन मुंबई येथे दाखल झाले आहे. हा प्रवास करण्यामागे कारगिल युद्धात शहिद झालेल्या ५५९ लष्करी अधिकारी व जवानांचे छायाचित्र उपलब्ध नसून यात ते ‘कारगिल -अनसंग हिरो ‘ या शीर्षकाखाली त्यांची माहिती व फोटो जमा करण्याबरोबर त्यांच्या परिवाराचा सन्मान करणे असा राहणार आहे.
करगिल युद्ध विजय दिनाचे २०२४ हे रजत महोत्सवी वर्ष असणार आहे. त्यानिमित्ताने ‘सफर शहादत के सन्मान का सफर वीरों के बलिदान का ‘अशा संकल्पनेनुसार त्यांनी हा विशेष प्रवास सुरु केला आहे. यादरम्यान हे दोघेही सुमारे २२ दिवस प्रवास करत लेह येथे या यात्रा पोहचेल. या प्रवासादरम्यान कारगिल युद्धात शहीद झालेल्या ५५९ लष्करी अधिकारी व जवानांच्या परिवाराला त्यांच्या घरी भेट देऊन त्या शहिदांच्या नावे दीप प्रज्वलन करणार आहे. याशिवाय कारगिल युद्धात सहभागी असणाऱ्या भारतीय लष्कराच्या ७८ विविध तुकड्यांना भेट देत त्यांना सन्मानचिन्ह देणार आहे.या ‘ सफर शहादत के सन्मान का सफर विरॊ के बलिदान का ‘ यात्रेद्वारे भारतीयांमध्ये देशभक्तीसह शहिदांच्या स्मृती जोपासण्याचा संदेशहीं देतील. सहभागी असलेले नायक दीपचंद चालते फिरते शहीद स्मारक अशी ओळख असलेले गौतम अभिषेक या दोघांनी विशेष पद्धतीने रचना व सजावट असलेल्या वाहनाच्या साथीने देवळालीतून मुंबईकडे काल ३१ जुलै रोजी सकाळी प्रस्थान ठेवले आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आजही कारगिल युद्धात शहीद झालेल्या विविध ५५९ लष्करी अधिकारी व जवानांचे छायाचित्र उपलब्ध नाही या यात्रेतून हा हेतू देखील साध्य करून ‘कारगिल -अनसंग हिरो ‘ या शीर्षकाखाली त्यांची माहिती व फोटोही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.
