आदिवासी नागरिकांसाठी १ ते १५ ऑगस्ट दरम्यान जातीचा दाखला काढण्यासाठी विशेष मोहीम-मंत्री छगन भुजबळ
आदिवासी नागरिकांसाठी १ ते १५ ऑगस्ट दरम्यान जातीचा दाखला काढण्यासाठी विशेष मोहीम-मंत्री छगन भुजबळ

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला,दि.31 जुलै 2024:-येवला मतदार संघातील जे आदिवासी बांधव जातीच्या दाखल्यापासून वंचित आहे अशा आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिर घेऊन त्यांना तात्काळ जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यात यावे अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. त्यानुसार दि. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या दरम्यान येवला संपर्क कार्यालय व विंचूर संपर्क कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी केले आहे.
दि. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ दरम्यान जातीचा दाखला काढण्यासाठी येवला संपर्क कार्यालय व विंचूर संपर्क कार्यालय येथे व्यवस्था करण्यात आली आहे. आदिवासी बांधवांनी जातीचा दाखला काढण्यासाठी, आधार कार्ड, रेशनकार्ड, जन्म नोंद, अर्जदार/वडील / आजोबा / चुलते यांचा शाळा सोडल्याचा/जन्माचा दाखला, तसेच वंशावळीबद्दल अर्जदार यांचे स्वयंघोषणापत्र आवश्यकता असणार आहे.त्याचबरोबर सन १९५० पूर्वीचा जन्माचा पुरावा उपलब्ध नसेल तर तलाठी पंचनामा ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे ज्या आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी संबंधित कागदपत्रे घेऊन येवला व विंचूर संपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी केले आहे.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये