नांदगाव पाणीपुरवठा योजनेला, छत्रपती संभाजी महाराज नाव… आमदार सुहास कांदे
नांदगाव पाणीपुरवठा योजनेला, छत्रपती संभाजी महाराज नाव... आमदार सुहास कांदे

वेगवान नाशिक / Wegwan NASHIK
नांदगाव, दिनांक 30 जुलै 2024 मंगळवार
नांदगाव तालुका प्रतिनिधी – (मुक्ताराम बागुल) :– नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरासाठी गिरणा धरणावरून स्वतः पाणीपुरवठा योजना शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तर योजनेला अनुदानातुन मंजूर झालेल्या व सध्या प्रगतीपथावर असलेल्या नांदगाव शहर पाणीपुरवठा नळ योजनेस आता छत्रपती संभाजी महाराज नांदगाव पाणीपुरवठा योजना म्हणून ओळख मिळाली आहे.
नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव शहरास स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी येत असलेल्या योजनेतील जलवाहिनी टाकण्याचे काम बहुतांशी पूर्ण होत आले आहे. जलकुंभ जलशुद्धीकरण केंद्र किरणा धरणावरील जॅकवेल इत्यादी कामे पूर्णत्वास येण्याच्या दिशेने जात असताना आमदार सुहास गाणे यांनी या नळ योजनेला छत्रपती संभाजी महाराज नांदगाव पाणीपुरवठा योजना असे नामकरण करण्याचे निर्देश नांदगाव नगरपालिकेला प्रशासनाला दिले होते.
नांदगाव नगरपालिकेचे मावळते प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक धांडे यांनी तसा प्रशासकीय ठराव मंजूर झाल्याच्या कार्यवाहीचे पत्र विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांना नुकतेच सादर केले आहे. आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजना साठी एक हजार कोटी च्या वर अधिक निधी मंजूर करून आणला असून त्यातील योजनेच्या कामाची वाटचाल पूर्णत्वाकडे असल्याचे दिसून येते. यामुळे नांदगाव तालुक्यातील नागरिक आनंदी असल्याचे दिसून येत आहे.◊
