घरात अवैधपणे दडविलेला बारा लाखांचा मद्य साठा जप्त….
घरात अवैधपणे दडविलेला बारा लाखांचा मद्य साठा जप्त....

वेगवान नाशिक/ नाशिक नितीन चव्हाण:, ता ३० जुलै २०२४
सिडको परिसरातील भुजबळ फार्म नजिक असलेल्या एका इमारतीत लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा मिळुन आला या प्रकरणी विकी सुधिर बटाविया(वय ४४)याच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिकचे अधिक्षक एस व्ही गर्जे यांनी कारवाई केली आहे.
दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपीला दर सोमवारी न्यायालयात हजर रहाण्याचे आदेश देण्यात आले एरव्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाने मारलेल्या छाप्यातील संशयीतींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळत नसतांनाही विकी बटावियाला तात्काळ जामीन मंजुर झालाच कसा असा सवाल उपस्थित होत आहे.
अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भुजबळ फार्मनजीक असलेल्या श्री जी लक्झरीया या सोसायटीच्या सी वींग मधिल तळमजल्यावर विकी सुधिर बटाविया हा इसम कायमस्वरूपी वास्तव्याला आहे
विकी बटाविया हा संरक्षण विभागासह दमनची बनावट दारु तसेच नामांकित कंपनीच्या बनावट स्कॉच आणुन त्याच्या रहात्या घरी त्याचा अवैद्य रित्या साठा करत असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती
त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून विकी सुधिर बटाविया याच्या एम एच १५ जे डी ९८१० या चारचाकी वाहनाची झडती घेतली
असता त्याच्या चारचाकी वाहनात तसेच त्याच्या रहात्या घरात नामांकित कंपनीच्या बनावट स्कॉच, तसेच डिफेन्सची दारु तसेच दमनची बनावट दारुच्या ७५० मि.लीटरच्या सुमारे ३लाख ५८हजार रुपये किंमतीच्या १३४ दारुच्या बाटल्या ८लाख रुपये किमंतीचे चारचाकी असा एकुन११लाख ५८हजार रुपये किंमतीचा माल जप्त केला.
असुन या प्रकरणी विकी बटावियाला याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात बनावट आणि अवैद्य मद्य साठा बाळगल्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करुन त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी न्यायालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस व्ही गर्जे यांनी सांगितले
