सरकारी माहिती

ऑपरेशन विजयच्या स्मरणार्थ मध्य रेल्वेच्या गिर्यारोहकांनी टोलोलिंग शिखर यशस्वी पार

टोलोलिंग शिखरावर चढाई करणारी पहिली नागरी मोहीम


वेगवान नाशिक/वेगवान नाशिक

विशेष प्रतिनिधी २९ जुलै-                                        ऑपरेशन विजयच्या स्मरणार्थ मध्य रेल्वेच्या गिर्यारोहकांनी टोलोलिंग शिखर यशस्वी पार केले
टोलोलिंग शिखरावर चढाई करणारी पहिली नागरी मोहीम

२५व्या कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ, सेंट्रल रेल्वेच्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब (सीआरएएससी) च्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वेच्या गिर्यारोहकांच्या संघाने कारगिल सेक्टर मध्ये दि. २९.०७.२०२४ रोजी सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या (सीआरएसए) सहकार्याने द्रासमधील टोलोलिंग शिखर सर करण्यात अतुलनीय यश मिळविले आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री राम करन यादव यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने, दि. १६.०७.२०२४ रोजी मुंबई येथून निघालेल्या संघाने दि. २९.०७.२०२४ रोजी शिखर यशस्वी सर केले. सकाळी ५.०० वाजता संघाने सुरुवात केली आणि लष्कराच्या जवानांनी अंदाजे वेळेपेक्षा ९० मिनिटे आधी मोहीम पूर्ण करून सकाळी १०.३० वाजता शिखरावर पोहोचले.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

ऑपरेशन विजयमध्ये सहभागी झालेल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली म्हणून संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या मोहिमेचा हा संघ भाग होता. कारगिल विजय दिवस दरवर्षी दि. २६ जुलै रोजी साजरा केला जातो, ज्या दिवशी भारतीय सैनिकांनी १९९९ मध्ये शत्रूने ताब्यात घेतलेल्या शिखरावर पुन्हा कब्जा केला. हा दिवस त्यांच्या धैर्याची आणि त्यांनी देशासाठी केलेल्या अंतिम बलिदानाची आठवण करून देतो.

टोलोलिंग शिखरावरची ही पहिली नागरी मोहीम होती आणि संरक्षण मंत्रालय आणि भारतीय लष्कराने या मोहिमेसाठी सतत आणि अथक पाठिंबा दिला आहे.
सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबच्या संघाचा राष्ट्रीय कार्यांना प्रोत्साहन देणाऱ्या मोहिमा हाती घेण्याचा समृद्ध इतिहास आहे. भूतकाळात, टीम सदस्यांनी ७१३५ मीटर उंच माउंट नन शिखर यशस्वी पार केले होते आणि माउंट एव्हरेस्टवर ८००० मीटरची उंची देखील गाठली आहे. त्यांचे समर्पण आणि चिकाटी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि हे यश सीआरएसएच्या यशातील आणखी एक पैलू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!