नाशिक ग्रामीणनाशिकचे राजकारण

सिन्नरचा विकास सुरुच राहवा यासाठी कोकाटे यांना विधानसभेत पाठवा…

सन्मान यात्रा दरम्यान सुनील तटकरे म्हणाले ! !


वेगवान नाशिक / भाऊसाहेब र.हांडोरे

सिन्नर ‌: दि. २९ जुलै २०२४ आगामी विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावत असताना सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सारखे तळमळीने काम करणारे लोकनेते आमदार असणं गरजेचं आहे. असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान यात्रा दरम्यान सिन्नर येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे पार पडलेल्या बैठकीत श्री तटकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले. यावेळी महिला आयोगाच्या सदस्या सौ रुपाली ताई चाकणकर व तालुक्यातील माणिकराव कोकाटे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सिन्नर ची जनता बाहेरील उमेदवारी स्विकारणार नाही… तटकरे

” मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना फायद्याची ठरणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची विरोधक दिशाभूल करत आहे . कार्यकर्ते सहकार्य करतील अशी अपेक्षा .. तटकरे

सिमिंतिनी कोकाटे यांच्या रूपाने सिन्नर तालुक्याची ओळख झाली असून त्यांच्या सारखं संस्कार क्षम काम करणाऱ्या  महिलांना सन्मान द्या  … रूपाली  ताई चाकणकर

आज सिन्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसन्मान यात्रा पूर्वनियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने नियोजन व पूर्वतयारीबाबत प्रदेशाध्यक्ष मा. सुनीलजी तटकरे यांनी भेट देऊन आढावा घेतला. यावेळी यात्रेसाठी आवश्यक ते सर्व नियोजन आणि तयारी बाबत विस्तृत माहिती त्यांनी घेऊन या यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या सन्मानासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा श्रीमती. रुपाली चाकणकर,अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडी, नाशिक लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष श्री. विष्णुपंत म्हैसधुणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुरज चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. प्रशांत कदम उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!